Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस

Team Agrowon

Pune News : राज्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत.

खानदेशात आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याची आवक सुरूच आहे. मध्य महाराष्ट्रातील धरणे ८० टक्केपर्यंत भरत आल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

मध्य महाराष्ट्रात दावडी घाटमाथ्यावर सर्वाधिक १३९ मिलिमीटर पडला. तर शिरगाव घाटमाथ्यावर १०८ मिलिमीटर, उर्वरित घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस पडला. त्यामुळे धबधबे आणि ओढे, नाले भरून वाहत आहे.

त्यामुळे धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. सोमवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये पुणे जिल्ह्यातील २६ धरणांत ८.४० टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली असून एकूण उपलब्ध पाणीसाठा १३०.३३ टीएमसी म्हणजे ६५ टक्केपर्यंत पोहोचला आहे.

तर पवना धरण ८४.५८ टक्के, मुळशी ८४.३६ टक्के, आंध्रात ८९ टक्के भरले असून अद्याप विसर्ग सोडण्यात आलेला नाही. तर पुणे बंडगार्डन येथून उजनीत २१ हजार २७७ क्युसेक, चिल्हेवाडीतून ११२६ क्युसेक, कळमोडीतून ९७६, चासकमानमधून ३४४०, पानशेतमधून १५१३६, गुंजवणीमधून ६७६, वीरमधून १५,१११, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग सोमवारी दुपारी वाढवून २५ हजार ३६ क्युसेक करण्यात येत आहे.

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसचा जोर कमी झाल्याने वारणा धरणातून सुरू असलेल्या १६,९७६ क्युसेक विसर्ग कमी करुन वक्रद्वारातून १०८८५ व विद्युत गृह मधून १४०० असे एकूण १२२८५ क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी पावसाची उघडीप असून वारणा धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली असल्याने सांगली जिल्ह्यातील पूरपट्ट्यातील लोकांना दिलासा मिळाला आहे.

नगर, सोलापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आहे. तर खानदेशात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे भुसावळ (जि. जळगाव) नजीकच्या तापी नदीवरील हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे.

त्यामुळे धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले आहेत. तापी नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

विदर्भात सर्वच भागात पाऊस पडत आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे भंडाऱ्यातील भंडारा-रामटेक मार्गावर टवेपार येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली होती.

पेंच नवेगाव धरणाच्या पाणीसाठा १०० टक्के झाल्यामुळे धरण सुस्थितीत, नियंत्रणाकरिता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे दोन गेट रात्री ९.१५ वाजता ०.३० मी. उंचीने उघडण्यात येत आहे.

यामधून ६३.३६८ क्युसेकने सोडण्यात येत आहे. तोतलाडोह धरणातून येवा जास्त येत असल्याने सर्व १६ वक्राकार द्वारे ३० सेंटिमीटरने टप्प्याटप्प्याने उघडण्यात येतील. तसेच जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे, अशा सूचना देण्यात येत आहे.

वर्धा, अमरावतीमध्ये रिमझिम पाऊस पडत असून नागपूरला उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात केली आहे. मराठवाड्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मंडलात ३०, नागद ३६, बनोटी ३२ मिलिमीटर पाऊस पडला.

कोकणात सर्वच भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे पडझड सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : एक लाखावर शेतकरी अर्थसाह्यासाठी पात्र

Crop Damage : पावसामुळे २४ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Crop Damage : सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान

Rabi Season : रब्बी पेरणीसाठी ४७ हजार क्विंटल बियाण्याची मागणी

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; आंबिया बहार २०२३-२४ मधील नुकसानग्रस्तांना दिलासा

SCROLL FOR NEXT