डॉ. अविनाश कर्जुले.Chickpea Cultivation: धान्यापेक्षा बियाण्याला बाजारात कायम चांगला दर मिळतो. त्यामुळे हरभरा पिकाचे बिजोत्पादन करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरु शकते. हरभऱ्याचे बिजोत्पादन करताना बियाण्याची शुद्धता जपणे फार आवश्यक असते. जमिनीची मशागत, पेरणी, खत पाणी आणि आंतरमशागत व्यवस्थापन आणि महत्त्वाचं म्हणजे विलगीकरण, भेसळ काढणे हेसुद्धा फार महत्त्वाचे असते. योग्य पद्धतीने बिजोत्पादन केल्यास शेतकरी शुद्ध आणि दर्जेदार बियाण्यांसोबत आर्थिक फायदाही मिळवू शकतात..जमीन व हवामानमध्यम ते भारी, पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन हरभऱ्यासाठी योग्य आहे. क्षारयुक्त, पाणथळ किंवा फार हलकी जमीन टाळावी. जमिनीचा सामू साधारण ६.५ ते ७.५ आणि सेंद्रिय कर्ब ०.५ टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त असावा. हरभऱ्यासाठी थंड, कोरडे हवामान आणि १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान हरभऱ्याच्या वाढीस चांगले असते..वाणयंदा पेरण्या लांबणीवर गेल्यामुळे उशिरा लागवड चालू आहे. उशिरा पेरणीसाठी विजय, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विश्वराज (देशी), तर काबुलीमध्ये विराट, पीकेव्ही-२, कृपा हे वाण चांगले उत्पादन देतात. उशिरा पेरणीसुद्धा १५ डिसेंबरच्या आत करावी. अन्यथा डिसेंबर नंतर पेरणी केल्यास उत्पादन खूप कमी होते..बियाण्याची पेरणीहरभऱ्याचे लहान दाणे असल्यास ६० ते ६५ किलो/हेक्टर तर मध्यम दाणे म्हणजे जसे फुले विक्रम, फुले विश्वराजचे असतात. तसे असल्यास ७० किलो/हेक्टर बियाणे लागते. विशाल, दिग्विजय, विराट, PKV-2 या वाणांचे किंवा यासारखे टपोरे दाणे असल्यास १०० किलो/हेक्टर बियाणे वापरावे. पेरणीवेळी ओळीत अंतर ३० सें. मी. आणि दोन झाडांत १० सें. मी. अंतर ठेवावे. सरीवरंबा पद्धतीने पेरणी केल्यास पाण्याचा निचरा चांगला होतो आणि मुळकुज कमी दिसते..बियाणे निवड व बीजप्रक्रियाबिजोत्पादनासाठीचे बियाणे प्रमाणित विक्रेत्याकडूनच घ्यावे. पिशवीवरील टॅग, लॉट नंबर आणि चाचणीची तारीख तपासावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २.५ ते ३ ग्रॅम थायरम किंवा बाविस्टीन बुरशीनाशक आणि त्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक २०० ते २५० ग्रॅ. प्रती १० किलो बियाणे वापरावे. तसेच बीजप्रक्रिया करून सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी..खत व पाणी व्यवस्थापनबिजोत्पादन करण्यासाठी प्रति हेक्टर साधारण २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ३० किलो पालाश द्यावे. हेक्टरी १२५ किलो डीएपी आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीवेळी दुचाकीने द्यावे. हरभऱ्याला २ ते ३ पाण्याच्या पाळ्या पुरेशा असतात. जसे पहिले फुलोरा येताना, दुसरे घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे. जास्त पाणी दिल्यास हरभरा उभाळतो आणि उत्पादन घटते..आंतरमशागत व तण नियंत्रणहरभरा पिकात पहिली कोळपणी व खुरपणी पेरणीनंतर २० - २५ दिवसांनी करावी. तर दुसरी ४० ते ४५ दिवसांनी करावी. तणनाशक वापरायचे असल्यास पेरणीपूर्वी पेंडिमेथालिन २.५ लि./हेक्टर ओलसर जमिनीत फवारावे..बीज पिकाची शुद्धता व भेसळ नियंत्रणबीज पिकाची शुद्धता जपण्यासाठी इतर हरभरा जातींपासून पायाभूत बियाण्यासाठी १० मीटर, आणि प्रमाणित बियाण्यासाठी 5 मीटर विलगीकरण अंतर ठेवावे. फुलोऱ्यापूर्वी आणि फुलोऱ्यात गुणधर्म न जुळणारी आणि रोगट झाडे मुळासकट उपटून काढावीत. यामुळे बियाण्याची अनुवंशिक शुद्धता टिकते..काढणी, मळणी व साठवणूकपाने व घाटे वाळल्यावर काढणी करावी, उशीर केल्यास घाटे गळतात. बियाणे चांगले वाळवून बियाण्यातील ओलावा जास्तीत जास्त ९ टक्क्यांपर्यंत आणावा. तसेच थायरम २.५/किलोने बीजप्रक्रिया करून स्वच्छ पोत्यात साठवण करावी..डॉ. अविनाश कर्जुले, ९४२१५८३६१८सहाय्यक बियाणे संशोधन अधिकारी, म. फु. कृ. वि. राहुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.