Amravati News: मेळघाट आणि अचलपूर परिसरातील शेतीविषयक तसेच अन्य मागण्यांसाठी तेथील आदिवासींनी हिवाळी अधिवेशनावर धडकण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आज (ता. ८) सकाळपासून परतवाड्यातून पदयात्रेला सुरुवात होणार असून, पाच दिवसांत तब्बल २०० किलोमीटरची पायपीट करीत ते नागपूरला पोहोचणार आहेत..आदिवासींकडून ‘मेळघाट व अचलपूर परिसरातील मका खरेदी नोंदणीची वेळ वाढविणे, शुक्रवारी व रविवारीसुद्धा नोंदणी सुरू ठेवणे, तांत्रिक अडचणी दूर करणे, मका खरेदीचा मोबदला किमान दोन-चार दिवसांत मिळावा, मिळालेल्या मोबदल्यातून कर्जाची कपात करण्यात येऊ नये,’ अशा मागण्यासुद्धा या पदयात्रेच्या निमित्ताने करण्यात येणार आहेत. .Adivasi Protest : किसान सभेचे आदिवासी विकास भवनात घुसून आंदोलन .मेळघाटात आधार कार्ड बनविणारे लुटत आहेत. आदिवासी बांधवांना आणि त्यांच्या मुलांना ठरलेल्या फीच्या दुप्पट, तिप्पट फी आकारण्यात येत आहे. तक्रारी करून सुद्धा काहीही होत नाही. .वनजनिमीवर शेती केलेल्या आदिवासी बांधवांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. मात्र ७/१२ केव्हा देण्यात येणार, याचा पत्ता नाही. या भागातील आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत. एकल महिलांच्या सर्वांगीण आर्थिक, सामाजिक विकासासाठी समितीचे गठण करण्यात आलेले नाही. बालसंगोपन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. मेळघाट मधील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा, अशा मागण्या आहेत. .Adivasi Festival : सातपुड्यात भोंगऱ्या बाजाराची धूम.२०० अर्ज, पण उत्तर नाहीमेळघाट व अचलपूर परिसरातील आदिवासी बांधवांसह अन्य समाजाचे लोकं लाकूड कापणी करणे, ते लाकूड ट्रकमध्ये लोड करणे, लाकूड कामगार म्हणून बरेच वर्षे काम करतात. मात्र त्यांना काम केल्याचा पुरावा मिळवून देण्यात आलेला नाही. याबाबत २०० च्या वर अर्ज दाखल करण्यात आले आहेत. परंतु अजूनही त्यांना पुरावा देण्यात आलेला नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे..कोट्यवधींचे भाडेशासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृह भाड्याच्या इमारतीत आहेत. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधीं रुपयांचे भाडे दिले जाते. आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी शासकीय इमारत का नाहीत? त्यासंदर्भात धोरण का आखण्यात आले नाही, असा सवालसुद्धा यानिमित्ताने विचारण्यात आला आहे..विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाहीमेळघाटच्या खटकाली गावात विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. मेळघाटातील सर्वच नागरिकांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी तत्काळ अंमलबजावणीची गरज आहे. आधार कार्ड नसल्याने येथील आदिवासी बांधवांना अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.