Kolhapur News: ‘‘रासायनिक खते आणि पाण्याचा अमर्याद वापर, बदलती पीक पद्धती तसेच सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. ज्याप्रमाणे आपले आरोग्य बिघडल्यावर आपण सर्व प्रकारच्या तपासण्या करूनच औषध घेतो, त्याचप्रमाणे मातीचेही परीक्षण करूनच उत्पन्न वाढीचे नियोजन केले पाहिजे,’’ असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले..जागतिक मृदा दिनानिमित्त जिल्ह्यातील तीनशे गावांमध्ये ‘चला माती समजून घेऊया, शेती समृद्ध करूया’ या अभियानाला भुदरगड तालुक्यातील पळशिवणे या गावातून सुरुवात झाली. या वेळी कार्यक्रमाला पळशिवणे गावातील शेतकऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, ‘गोपाल रत्न’ पुरस्कार विजेते अरविंद पाटील आणि कृषी विज्ञान केंद्र (कनेरी) येथील मृदाशास्त्र तज्ज्ञ राजेंद्र वावडे उपस्थित होते..Soil Testing: अतिवृष्टीनंतर रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी माती परीक्षणकरुन खतांचे नियोजन.श्री. आबिटकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियाना’अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘हेक्टरी १२५ टन शाश्वत ऊस उत्पादकता वाढ’ अभियानातील हा एक महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये एकाच दिवशी हा कार्यक्रम पार पडला. येत्या मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २६ हजार शेतकऱ्यांना ‘जमीन आरोग्य पत्रिके’चे वितरण करण्यात येणार आहे..Soil Testing : सोलापूर जिल्ह्यात ग्रामस्तरावर १५ मृद परीक्षण केंद्रांना मान्यता.पळशिवणे येथील शेतकऱ्यांच्या शेतात या वेळी माती परीक्षणासाठी आवश्यक नमुने घेण्याची शास्त्रोक्त पद्धत तज्ज्ञांमार्फत शेतकरी व उपस्थितांना समजावून सांगण्यात आली. काही शेतकऱ्यांना ‘जमीन आरोग्य पत्रिके’चे वितरणही करण्यात आले. जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी प्रयोगशाळेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘माती परीक्षण माहिती पत्रिके’चे अनावरण करण्यात आले. शेतकऱ्यांनी ‘डिजिटल.मदतनीस - महाविस्तार मोबाइल ॲप’ या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर आधारित माध्यमाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग-महाराष्ट्र शासनआणि तालुका कृषी अधिकारी,भुदरगड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.