Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

Monsoon Rain : विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढणार ? राज्यातील अनेक भागात उद्या पाऊस उघडीप देण्याची शक्यता

Weather Update : हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला.
Published on

Pune News : राज्यातील काही भागात आजही पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे शेतीपिकांचेही नुकसान होत आहे. तर सततच्या ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगांचाही प्रादुर्भाव वाढत आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला. 

Monsoon Update
Monsoon Rain : पावसाचा जोर ओसरला

हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक. धुळे, जळगाव, नंदूरबार, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

Monsoon Update
Monsoon 2024 : मॉन्सूनचे रंग नवे

उद्या राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप पाहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने उद्या रत्नागिरी, रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच कोकणातील जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

बुधवारपासून मात्र कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर राज्यातील इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com