Rain Forecast Agrowon
हवामान

Weather Forecast : विदर्भात पाऊस, गारपिटीचा इशारा

Rain Update : विदर्भात मंगळवारी (ता. १०) सकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला आहे. मंगळवारी विदर्भासह मराठवाड्यात वादळी पावसाचे ढग दाटून आले होते.

अमोल कुटे

Pune News : विदर्भात मंगळवारी (ता. १०) सकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला आहे. मंगळवारी विदर्भासह मराठवाड्यात वादळी पावसाचे ढग दाटून आले होते. राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. आज (ता. १०) विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रातही विजांसह पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तर गुजरातपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान झाले असून, विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू आणि संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे. तर चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे.

विदर्भासह राज्यात ढगाळ आकाश होत आहे. विदर्भाच्या कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमान चाळिशीपार आहे. मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. १०) विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. मराठवाड्यात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.५, नगर ३८.०, धुळे ४०.०, जळगाव ३९.४, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३२.७, मालेगाव ४१.८, नाशिक ३७.६, निफाड ३६.०, सांगली ३९.७, सातारा ३८.७, सोलापूर ४२.०, सांताक्रूझ ३३.३, डहाणू ३३.५, रत्नागिरी ३३.६,

छत्रपती संभाजीनगर ३८.६, बीड ३९.६, परभणी ३८.०, अकोला ३८.९, अमरावती ३७.४, बुलढाणा ३७.५, ब्रह्मपूरी ३४.४, चंद्रपूर ३७.०, गडचिरोली ३४.४, गोंदिया ३२.८, नागपूर ३२.८, वर्धा ३६.१, वाशीम ३८.४, यवतमाळ ३७.०.

वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ४२, मालेगाव ४१.८, धुळे ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT