Weather Station : आता शेतकरीच उभारतील हवामान केंद्र

Crop Advisory : वातावरणातील बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (जि.नगर) येथील तज्ज्ञांनी खास हवामानाची माहिती देणारी खास ‘सेंसर बेस’ यंत्रणा विकसित केली आहे.
Weather Station
Weather StationAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : वातावरणातील बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (जि.नगर) येथील तज्ज्ञांनी खास हवामानाची माहिती देणारी खास ‘सेंसर बेस’ यंत्रणा विकसित केली आहे.

यातील पोर्टेबल यंत्रणा तीन ते सहा हजार, तर अचूक माहिती देणारी यंत्रणा ४० हजार ते दोन लाख रुपयांना उपलब्ध असल्याची माहिती विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी नागपूर दौऱ्यात ‘ॲग्रोवन’शी संवाद साधताना दिली.

डॉ. गोरंटीवार यांच्या माहितीनुसार, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) चा प्रभावी वापर यात करण्यात आला आहे. पावसाची अनिश्चितता, तापमान वाढ, वाऱ्याचा वेग हे सारे घटक पीक उत्पादकतेवर परिणाम करणारे ठरतात. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने ‘सेंसर बेस’ यंत्रणा विकसित केली आहे.

Weather Station
Weather Station : प्रत्येक गावामध्ये का असावे हवामान केंद्र?

याद्वारे प्राप्त हवामान डेटाचा उपयोग करून काही बाबी ठरविण्यासाठी संगणकीय प्रारूप (सॉफ्टवेअर) तयार केले आहेत. वेदर स्टेशनचा डेटा या सॉफ्टवेअर गेल्यानंतर पाणी देण्याची गरज असेल तर पंप आपोआप सुरू होईल, अशी ‘आयओटी’ची संरचना आहे. त्याकरिता पंपाजवळ कंट्रोलर बसविले जातात. या सर्व घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना मोबाइलवर मिळते.

अशी आहे संरचना

पारंपरिक वेदर स्टेशनमध्ये दहा बाय दहा मिटर क्षेत्रावर नोंद घेणारी यंत्रणा बसविलेली असते. एक व्यक्‍ती सकाळ, दुपारी याच्या नोंदी घेतो. याला मर्यादा आहेत. त्यामुळेच जलदगतीने हवामान मोजमापाची गरज लक्षात घेत सेंसरबेस यंत्रणा विद्यापीठाने विकसित केली आहे. याकरिता केवळ पाच बाय पाच मिटरच्या जागेची गरज भासते. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचे तास, पाऊस याविषयीचे सेंसर राहतात.

Weather Station
Automated Weather Stations : पावसाच्या अचूक आकड्यांसाठी हवी स्वयंचलित हवामान केंद्रे

एका ठिकाणी बसविल्यानंतर एक हजार हेक्‍टरच्या क्षेत्रात याच्या नोंदी समान राहतात, असे निष्कर्ष आहेत. पाऊस मात्र बदलतो. १५ लाख सुरुवातीला किंमत होती आता हे अवघ्या तीन लाख रुपयांत उपलब्ध होत आहेत. तीन वर्षांपर्यंत डेटा उपलब्ध करून देतात. त्यानंतर २० हजार रुपयांना परवाना नूतनीकरण करण्यास सांगितले जाते.

अचूकता थोडीफार कमी असली तरी चालेल पण कमी किमतीचे वेदर स्टेशन हवे, अशी मागणी काही शेतकऱ्यांची असते. पोर्टेबल लोकॉस्ट हवामान केंद्र तीन हजार रुपयांत विकसित केले आहे.

पोर्ट्रेबल असल्याने हे स्थलांतरित करता येते. तापमान, आर्द्रता याची माहिती यातून मिळते. त्यापेक्षा प्रगत पाच हजार रुपयांना असून त्याद्वारे पाऊस, आर्द्रता, तापमान याची माहिती मिळते त्यापेक्षा अधिक प्रगत सात हजार रुपयांना आहे. तीन ते सहा हजार रुपयांना उपलब्ध असलेल्या वेदर स्टेशन प्रणालीची अचूकता कमी असून ४० हजार ते दोन लाख रुपयांत असलेल्यांची अचूकता १०० टक्‍के आहे.

मेट्रोलॉजिक ग्रेड सेंसर बाजारात आहेत. त्यात कॅलीब्रेट केली. वेगवेगळ्या प्रकारची स्वयंचलित हवामान केंद्र तयार करण्यात आली आहे. तापमान, आर्द्रता, पाऊस यापैकी कोणती माहिती हवी आहे नेमकी तीच माहिती त्याला मिळू शकते. अशा प्रकारची यंत्रणा कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.
- डॉ. सुनील गोरंटीवार, संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com