Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Latest Weather Forecast : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने पावसाचे पुनरागमन होण्याचे संकेत आहेत. आज (ता. १५) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने पावसाचे पुनरागमन होण्याचे संकेत आहेत. आज (ता. १५) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे कायम असून, चार-ते पाच दिवसांत हा आस त्याच्या सर्वसाधारण स्थितीत येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस अमृतसर, कर्नाल, मेरठ, लखनौ, साबौर, गोल्परा ते नागालँडपर्यंत सक्रिय आहे.

दक्षिण बांग्लादेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावरही समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

मॉन्सूनचा आस उत्तरेकडे गेल्याने राज्याच्या पावसात खंड पडला आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडाही जाणवत असून, पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १५) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Produce Processing: शेतकरी उत्पादकासोबत प्रक्रियादार, निर्यातदार व्हावा : मंत्री रावल

Irrigation For Agriculture : शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळणे हीच प्राथमिकता

Blue Green Algae: भात पिकासाठी निळे-हिरवे शेवाळ ठरते फायदेशीर; नत्राची बचत करण्यासाठी मदत

Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता

Solapur ZP : ६८ सदस्य, ८५ कोटी निधी, तरीही गणित जुळेना

SCROLL FOR NEXT