Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर रविवारी आणि सोमवारी उत्तर भागावर १००४ मध्यभागावर १००६ आणि दक्षिण भागावर १००८ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. मंगळवार (ता.१५) ते शुक्रवार (ता.१८) या कालावधीत उत्तरेस १००६ हवेचा दाब व दक्षिण भागावर १००८ हेप्टापास्कल इतका वाढेल.
त्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील आणि प्रखर सूर्यप्रकाशाची शक्यता निर्माण होईल आणि चांगला सूर्यप्रकाश मिळेल. मात्र शनिवारी (ता.१९) रोजी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ तर दक्षिणेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल हवेचा दाब कमी होईल, पावसाची शक्यता निर्माण होईल.
हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा प्रभाव समान म्हणजे ३९ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे एल निनोचा सध्या प्रभाव नाही. आयओडी पॉझिटिव्ह राहण्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या १९ तारखे पासून नैऋत्य मॉन्सूनचा प्रभाव वाढणे शक्य आहे. त्यामुळे ऑगस्टच्या अखेरच्या १० दिवसात चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्य आहे.
सध्या सातारा, सांगली आणि जालना या जिल्ह्यातील सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. या आठवड्यात त्यात भर पडणे शक्य आहे. तर नांदेड, लातूर, पालघर, ठाणे, रायगड आणि यवतमाळ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. एकूणच हवामान बदलाने यावर्षी मॉन्सून प्रभावित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोकण : सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यात रविवारी सोमवारी ८ मि.मी पावसाची शक्यता असून रत्नागिरी जिल्हयात १२ ते १५ मि मी पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्हयात मात्र ५ मि.मी. रविवारी व सोमवारी पावसाची आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १३ कि.मी. राहील.
रायगड व ठाणे जिल्हयात १७ ते १९ कि.मी. आणि पालघर जिल्ह्यात २३ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ७१ ते ७५ हे सर्वच जिल्ह्यात राहील तर दुपारची सापेक्ष आद्रता ७० ते ७५ टक्के सर्वच जिल्ह्यात राहील.
उत्तर महाराष्ट्र :
नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सो रविवारी व सोमवारी अल्प ते अत्य अल्प राहील, बाष्पीभवनाचा वेग वाढेल. कमाल तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ७७ ते ८५ टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता ५४ ते ६४ टक्के राहील.
मराठवाडा:
मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्हयात रविवारी व सोमवारी अल्प पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात रविवारी व सोमवारी पावसात पूर्णपणे उघडीप राहण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यात उघडीप राहील सूर्यप्रकाश चांगला राहील.
हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. तर उस्मानाबाद, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ७५ ते ८२ आणि दुपारची सापेक्ष आद्रता ५० ते ५२ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ:
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात रविवारी व सोमवारी अल्पशा पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग १८ ते २० कि.मी. राहील. बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश
सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ८० ते ८४ टक्के आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५९ टक्के राहील.
मध्य विदर्भ :
यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १८ कि.मी राहील. यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस आणि नागपूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ८० ते ८४ टक्के दुपारची सापेक्ष आद्रता ५७ ते ६२ टक्के राहील.
पूर्व विदर्भ ः
गोंदिया जिल्ह्यात रविवारी ४ मिमी व सोमवारी ८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात सोमवारी १ ते २.५ मिमि आणि सोमवारी ३ ते ७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १३ कि.मी. राहील. भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात ३२ अंश सेल्सिअस आणि गोंदिया जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील, आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ८१ ते ९० टक्के आणि दुपारची सापेक्ष आद्रता ५५ ते ६० टक्के राहील.
दक्षिण- पश्चिम महाराष्ट्र :
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी १ ते १.७ मि.मी पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसात उघडीप राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्हयात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील, नगर जिल्ह्यात ३९ अंश आणि सोलापूर जिल्हयात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता सोलापूर व नगर जिल्हयात ७६ टक्के, सांगली सातारा व पुणे जिल्ह्यात ८२ ते ८७ टक्के आणि कोल्हापूर जिल्ह्यात ९१ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आद्रता ६५ ते ७५ टक्के राहील.
कृषी सल्ला
१) पावसातील उघडीप लक्षात घेऊन सर्व पिकांत आंतर मशागतीची कामे पूर्ण करावीत.
२) जेथे पाण्याची सोय आहे तिथे पिकांना तुषार किंवा ठिबकद्वारे पाणी द्यावे.
३) तृणधान्य पिकांना नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
४) फळभाज्या व फळपिकांत किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणाच्या उपाय योजना कराव्यात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.