Rain Forecast  Agrowon
हवामान

Maharashtra Rain: शनिवारी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; राज्यातील तापमानात चढ उतार सुरु

Weather Update : राज्यातील तापमानात सध्या चढ उतार होताना दिसत आहेत. काही भागात काही वेळ ढगाळ वातावरण दिसत आहे. मात्र पावसाने हजेरी लावल्याची नोंद नाही.

अनिल जाधव

Pune News : राज्यातील तापमानात सध्या चढ उतार होताना दिसत आहेत. काही भागात काही वेळ ढगाळ वातावरण दिसत आहे. मात्र पावसाने हजेरी लावल्याची नोंद नाही. राज्याच्या काही भागात शनिवारी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

राज्यात सकाळी वातावरणात थंडी जाणवत आहे. तर काही भागात दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. पण मागील दोन दिवसांपासून पावसाची नोंद नव्हती. पण हवामान विभागाने सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी आणि रविवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तसेच यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

सध्या श्रीलंका आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती १.५ किलोमीटर उंचीवर आहे. तर पश्चिमी विक्षोप सध्या ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. पश्चिम विक्षोपाचा परिणाम हिमालयाच्या पूर्वेकडील भागावर ७ नोव्हेंबरच्या रात्रीपासून दिसू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. आज तमिळनाडू, पुद्दूचेर्री, कराईकल, केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक च्या काही भागात पाऊस पडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT