Pune News : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ऑक्टोबर हीटचा चटका कमी झाला आहे. कोकणात मात्र उन्हाचा चटका अद्यापही कायम आहे. आजपासून (ता. १) राज्याच्या किमान तापमानात घट होणार असल्याने राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, मंगळवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सांताक्रूझ येथे ३६.८ तर रत्नागिरी येथे ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे. राज्याच्या कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडीची चाहूल लागली असून, उत्तर महाराष्ट्रातील गारठा कायम आहे. मंगळवारी (ता. ३०) जळगाव येथे राज्यातील नीचांकी ११.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाड, छत्रपती संभाजीनगर येथे तापमानाचा पारा १४ अंशांच्या खाली आहे. राज्यात पहाटे गारठा जाणवू लागला असून, हळूहळू थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मंगळवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३२.१ (१६.४), जळगाव ३४.३ (११.०), कोल्हापूर ३२.१ (२२.०), महाबळेश्वर २६.५ (१६.५), नाशिक ३२.१ (१६.७), निफाड ३२.६ (१३.५), सांगली ३२.५ (२०.१), सातारा ३२.५ (१८.२), सोलापूर ३५.२ (१८.०), सांताक्रूझ ३६.८ (२३.०),
डहाणू ३५.८ (२२.०), रत्नागिरी ३६.३ (२३.६), छत्रपती संभाजीनगर ३२.६ (१४.०), नांदेड ३१.६ (१६.८), परभणी ३२.४ (१६.५), अकोला ३४.६ (१७.०), अमरावती ३२.८ (१७.३), बुलढाणा ३२.४ (१७.०), ब्रह्मपूरी ३५.० (१८.३), चंद्रपूर ३१.०(१७.०), गडचिरोली ३२.४ (१६.६), गोंदिया ३१.५ (१६.५), नागपूर ३१.७ (१७.०), वर्धा ३१.१(१७.९), वाशीम ३४.०(१५.६) यवतमाळ ३३.६ (१४.७).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.