Winter  Agrowon
हवामान

Hawaman Andaj : दक्षिण भारतात पावसाचा अंदाज; राज्याच्या अनेक भागात तापमानात घट; थंडीची चाहूल

Winter Season : उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हवेतील गारवा चांगलाच वाढला आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या काही भागात किमान तापमान १५ अंशाच्याही खाली गेले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हवेतील गारवा चांगलाच वाढला आहे.

नैॡत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मनारच्या आखातापासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भ, कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात उन्हाचा चटका अधिक आहे. तर राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यात किमान तापमानात वाढ होत आहे.

राज्यात कमाल-किमान तापमानातील तफावत वाढली आहे. यामुळे दक्षिण भारतातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळच्या काही भागात अतिजोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर आज सकाळी हिमाचल प्रदेशातील बहुतांशी भागात दाट धुके होते. 

राज्यात मात्र तापमानात घट होत असून थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील बहुतांशी भागात थंडी जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात हवेतील गारवा वाढला आहे. किमान तापमान काही ठिकाणी १३ अंशावर पोचले. तर अनेक भागात किमान तापमान १५ ते १७ अंशाच्या दरम्यान होते. पुढील काही दिवसांमध्ये थंडी आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’निवडणुकीत सुनेत्रा पवार पॅनेलची मुसंडी

Baramati KVK: कृषी विज्ञान केंद्र बारामतीला पुरस्कार

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

AI in Agriculture: ‘एआय’च्या मदतीने मराठवाड्यात एकरी १२५ टन ऊस

Soybean Price: अकोल्यात सोयाबीनचा सरासरी दर ६५०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT