Rain Update Agrowon
हवामान

Rain Update : आजही पावसाचा धोका कायम? उद्याही राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज

IMD Alert : हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील आणखी काही भागात पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Weather Forecast : राज्याच्या अनेक भागात पावसाने पिकांचे नुकसान केले. हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील आणखी काही भागात पावसाचा अंदाज दिला. तर उद्या विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली.

दोन दिवस राज्यात दाणादाण केल्यानंतर काही भागात आज पावसाचा जोर कमी झाला. पण हवामान विभागाने आज विदर्भातील नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह काही भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तसेच विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला.

तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह जोरदार सरी पडतील असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर आणि सोलापूर तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नगिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच राज्याच्या इतर भागात ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

तसेच उद्या म्हणजेच बुधवारी विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि नाशिक तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्याही काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात ठिकठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT