Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : सोमवारी काही भागात पावसाचा अंदाज; मंगळवारीही काही ठिकाणी हलक्या सरीची शक्यता

Rain Update : रब्बीच्या पेरणीसाठी काही भागात आता शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता आहे. पण दोन दिवस तरी कुठेही पावसाचा अंदाज नाही.

Anil Jadhao 

IMD Alert : राज्यात सकाळीच्या हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. तर दुपारी उन्हाचा चटका नकोसा होत आहे. रब्बीच्या पेरणीसाठी काही भागात आता शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता आहे. पण दोन दिवस तरी कुठेही पावसाचा अंदाज नाही. मात्र सोमवारपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

राज्यात आता थंडी पडायला सुरुवात झाली. मागील दोन दिवसांमध्ये हवेतील गारवा चांगलाच वाढला होता. दिपारी मात्र उन्हाचा चटका जाणवतोय. पुढील काही दिवसांमध्ये थंडी आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. राज्यात मागील काही आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. परतीचा पाऊसही अपेक्षेप्रमाणे झाला नाही. त्यामुळे रब्बीसाठी पावसाची गरज आहे. पण उद्याही राज्यात हवामान कोरडेच राहण्याचा अंदाज आहे.

सोमवारी मात्र राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. सोमवारी सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तसेच कोल्हापूर आणि सातार जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. तसेच मंगळवारीही सिंधुदूर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला. तर रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT