Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Rain Forecast : कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत असतानाच, राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानाचा पारा खाली आला आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आकाश ढगाळ झाले आहे. आज (ता. १५) कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविली आहे. किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

दक्षिण तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ देखील आणखी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडीची चाहूल लागली आहे. गुरुवारी (ता. १४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ११.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमान १५ अंश आणि त्यापेक्षा खाली आले आहे.

कोकणात कमाल तापमान अद्यापही ३५ अंशांच्या पुढे आहे. गुरुवारी (ता. १४) सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १५) उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच रायगड, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.४ (१५.२), अहिल्यानगर ३०.१ (१४.७), धुळे (११), जळगाव ३२.६ (१५), कोल्हापूर ३०.८ (२२), महाबळेश्‍वर २६.१ (१६), मालेगाव २९.४ (१५.६), नाशिक ३०.७ (१३.२), निफाड २९.५ (११.६), सांगली ३१.८ (२१.१), सातारा ३२ (१७.७), सोलापूर ३४.२ (२१.८), सांताक्रूझ ३६.१ (१९.०), डहाणू ३५.९ (१९.४), रत्नागिरी ३५.१ (२३.२), छत्रपती संभाजीनगर ३१.२ (१५.६), नांदेड (२०.७), धाराशिव ३०.९ (१९.१), परभणी ३२.२ (१६.३), परभणी कृषी विद्यापीठ ३१.८ (१४.४), अकोला ३३.९ (१८.८), अमरावती ३२.८ (१६.३), बुलडाणा ३० (१५.१), ब्रह्मपुरी ३३.२ (१६.२), चंद्रपूर ३१.४ (१५.८), गडचिरोली ३२.२ (१५.४), गोंदिया ३१.२ (१४.८), नागपूर ३१.८ (१५.०), वर्धा ३१ (१६.४), वाशीम ३४.८, यवतमाळ ३१ (१५.५).

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर.

विजांसह पावसाची शक्यता :

रायगड, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT