Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. विदर्भात पारा पस्तिशी पार गेला आहे. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. विदर्भात पारा पस्तिशी पार गेला आहे. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून, तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अमृतसरपासून, चंडीगड, डेहराडून, गोरखपूर, अरुणाचल प्रदेश दरम्यान हिमालयाच्या पायथ्यापर्यंत विस्तारला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून पूर्व-मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

राज्यात मॉन्सूनच्या पावसाने दडी मारली असली तरी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामान होत आहे. बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात अंशतः ढगाळ हवामान होते. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींनी शिडकावा केला. पावसाच्या उघडिपीने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीपार गेला आहे. विदर्भात पारा पस्तिशीपार गेला असून, चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, ‎वर्धा, अकोला आणि भंडारा येथे पारा ३५ अंशांच्या पुढे होता.

आज (ता. ७) सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका तसेच ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३०.४---२२.५

अहिल्यानगर---निरंक---२३.५

‎‎धुळे---३३.०---२०.०

जळगाव---३३.८---२०.०

जेऊर---३३.०---१९.०

‎‎कोल्हापूर---२९.१---२२.९

‎महाबळेश्वर---२२.२---१७.५

मालेगाव---३२.८---२१.४

‎‎नाशिक---२९.७---२१.४

‎निफाड---३१.८---२१.०

‎सांगली---३१.०---२२.३

‎सातारा---३०.७---२२.०

‎सोलापूर---३२.८---२३.०

‎सांताक्रूझ---३२.१---२६.०

डहाणू---३२.२---२४.९

‎रत्नागिरी---३०.५---२५.०

‎छत्रपती संभाजीनगर---३२.८---२२.७

‎धाराशिव---निरंक---२०.०

‎परभणी---३३.२---२४.७

परभणी (कृषी)---३१.६---२४.०

‎‎अकोला---३५.२---२५.५

अमरावती---३४.६---२३.३

भंडारा---३५.०---२५.०

बुलडाणा---३१.०---२३.०

‎ब्रह्मपुरी---३५.६---२६.५

चंद्रपूर---३६.०---२६.४

‎गडचिरोली---३३.६---२५.४

‎गोंदिया---३३.५---२५.८

‎नागपूर---३४.६---२६.०

‎वर्धा---३५.५---२६.४

‎वाशीम---३०.६---२३.२

‎यवतमाळ---३४.२---२४.४-

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

विजांसह पावसाची शक्यता :

ठाणे, रायगड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना.

३५ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎‎‎चंद्रपूर ३६, ब्रह्मपुरी ३५.६, ‎वर्धा ३५.५, अकोला ३५.२, भंडारा ३५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Growth: महाराष्ट्राच्या शेतीची अतिवृष्टीने वाताहत ; विकास दर ५.७ टक्क्यांनी घसरला

Agrowon Podcast: सोयाबीन आज स्थिर, कापूस भाव कमीच, हरभरा दबावात, वांग्याला उठाव, कारले टिकून

Maize Price: मक्याला एक हजार हमीभाव फरक द्या, अब्दुल सत्तार यांची विधानसभेत मागणी

Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढला; कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज कायम

Nana Patole statement : 'सरकारने 'बनिया' वृत्ती सोडावी'; सोयाबीन, कापूस, पिकविमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवर टिका

SCROLL FOR NEXT