Weather Agrowon
हवामान

Weather Update : गुरुवारपासून पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र गारठला 

Weather Forecast : राज्यातील काही भागात गुरुवारपासून पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यातील बहुतांश भागात पहाटे थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. तर दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. राज्यातील तापमानात चढ उतार सुरू आहे. हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. राज्यातील काही भागात गुरुवारपासून पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. 

सध्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यात कोरडं हवामान राहील. तर गुरुवारपासून म्हणजेच १४ नोव्हेंबरपासून मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

तसेच कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर शुक्रवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात मात्र प्रामुख्याने कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

कोकणात उन्हाचा पारा चढला आहे. त्यासोबतच गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा १३ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. उर्वरित राज्यात मात्र कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. 

पुढील चोवीस तासात नैऋत्य बंगालच्या उपसागरा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कमी दाब क्षेत्र तामिळनाडूकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे काढणी केलेला शेतमाल सुरक्षित जागेवर शेतकऱ्यांनी ठेवावा. तसेच कापणी केलेली पिकांची काढणी करून घ्यावी, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT