Weather Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain : आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज; राज्यात उन्हाचा चटकाही कायम

Weather Update : राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी पडत आहेत. तर बहुतांशी ठिकाणी उन्हाचा चटका कायम आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी पडत आहेत. तर बहुतांशी ठिकाणी उन्हाचा चटका कायम आहे. आजही हवामान विभागाने काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला. 


राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढत आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि उकाडा कायम आहे. आज मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने आज विदर्भातील बुलडणा, वाशीम, अकोला आणि अमरावती तर मध्य महाराष्ट्र्तील पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला.

तर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. उद्या म्हणजेच बुधवारी पुणे, नगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. 

विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान झाले होते. बुधवारी धाराशिव जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

Kharif Season Planning: निविष्ठांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी अचूक नियोजन करा : पालकमंत्री फुंडकर

Vidarbha Heat Wave: विदर्भातील तीन जिल्ह्यांत अति उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Banana Variety Selection: कमी पावसातील लागवडीसाठी केळीचा कंद निवडताना काय तपासावे?

SCROLL FOR NEXT