Monsoon 2024 Rain : आनंदाची बातमी… राज्यात यंदा चांगला पाऊस पडणार; देशात यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज : हवामान विभाग

Weather Update : दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात माॅन्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
`Weather Update
Weather Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात माॅन्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. देशात २०२४ च्या माॅन्सूनमध्ये सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले. 

हवामान विभागाने माॅन्सून हंगाम २०२४ चा आपला पहिला दीर्घकालीन अंदाज आज (ता.१५) जाहीर केला. या अंदाजानुसार देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

`Weather Update
Maharashtra Rain: मराठवाडा, विदर्भात ३ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता कायम

देशातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर नैऋत्य भारात, ईशान्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. १९७१-२०२० या वर्षांदरम्यान देशातील माॅन्सून काळात पावसाची सरासरी ८७ सेंटीमीटर आहे,असेही हवामान विभागाने स्पष्ट केले. 

हवामान विभागाने एल निनोबाबात माहीती देताना म्हटले आहे की, एल निनो सध्या मध्यम अवस्थेत आहे. एल निनो स्थिती माॅन्सूनच्या सुरुवातीला तटस्थ अवस्थेत राहू शकतो. तर माॅन्सून दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जैल किंवा ऑगस्टमध्ये ला निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील माॅन्सूनसाठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

`Weather Update
Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढणार

तसेच सध्या इंडियन ओसियन डायपोल अर्थात आयओडी सामान्य स्थितीत आहे. माॅन्सून काळात धन आयओडी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच उत्तर गोलार्धात युरेशियातील बर्फाच्छादन मागील तीन महिन्यात सरासरीपेक्षा कमी आहे. हिवाळा आणि वसंत ऋतुतील युरेशियातील बर्फाच्छान आणि माॅन्सूनमधील पाऊस यांच्यात विषम संबंध आहे. म्हणजेच या भागातील बर्फाच्छादन कमी झाल्यास भारतात माॅन्सून काळात चांगला पाऊस होतो आणि बर्फाच्छादन जास्त असल्यास पाऊस कमी पडतो. सध्या बर्फाच्छादन कमी असल्याने माॅन्सूनसाठी पोषक मानले जाते. 

माॅन्सूनला पोषक स्थिती

प्रशांत महासागरात सध्या एल निनो मध्यम अवस्थेत असून माॅन्सूनच्या सुरुवातील तटस्थ स्थितीत येण्याची शक्यता आहे. तर माॅन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ला निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. माॅन्सून काळात धन आयओडी निर्माण होण्यास पुरक स्थिती आहे. तसेच उत्तर गोलार्धात युरेशियातील बर्फाच्छादन कमी झाले आहे, हे सर्व घटक माॅन्सून काळात पाऊस पडण्यास पोषक आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

महाराष्ट्रात चांगला पाऊस

हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजात महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जास्त आहे. तर पूर्व विदर्भातसह इतर भागात सरासरीएवढ्या पावसाची शक्यता जास्त आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com