Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : राज्यात आणखी २ दिवस पावसाचा अंदाज ; विदर्भात पुढील ४ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Rain Forecast : राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. पण पावसाचे वितरण सध्याही असमान दिसत आहे.

अनिल जाधव

Pune News : राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. पण पावसाचे वितरण सध्याही असमान दिसत आहे. तर राज्यातील बहुतांशी भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज राज्यभरात काही ठिकामी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवमान विभागाने दिला.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. कोकणाताही पावसाचा अंदाज आहे.

बुधवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यात पावसाचा जोर बुधवारपासून कमी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

गुरुवारी आणि शुक्रवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावासचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT