Rain Forecast  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update : मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे गेल्याने राज्यात पावसाने दिलेली उघडीप कायम आहे.

Team Agrowon

Pune News : मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे गेल्याने राज्यात पावसाने दिलेली उघडीप कायम आहे. आज (ता. १२) कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून, ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ईशान्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे कायम असून, अमृतसरपासून, चंडीगड, बहारिच, मुजफ्फराबाद, बालूरघाट ते मिझोरामपर्यंत सक्रिय आहे.

मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे कायम राहण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या प्रवाहात खंड पडल्याने राज्यात अनेक भागांत मुख्यतः पावसाची उघडीप आहे. ढगाळ हवामानासह उकाडा जाणवत असून, ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे.

आज (ता. १२) कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT