Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप; पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज काय ? 

Maharashtra Rain Forecast : राज्यात आज मुख्यत: उघडीपीसह तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Dhananjay Sanap

Pune News : मागील आठवड्यापासून राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळं शेती कामांना वेग आला आहे. राज्यात आज मुख्यत: उघडीपीसह तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

तर पुढील पाच विविध भागात उघडीप राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, हलक्या तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे.

तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यत: उघडीप राहण्याचा अंदाज आहे. राज्यात पुढील पाच तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावतील.

परंतु प्रमुख्याने पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. विविध भागात फवारणी, खुरपणीची कामे सुरू आहेत. कोरड्या हवामानमुळे कामांना वेग आलेला आहे. मागील आठवड्यात बहुतांश भागात जोरदार सरीनं हजेरी लावली होती. त्यामुळे शेती कामांना ब्रेक लागला होता. आता पावसानं विश्रांती घेतल्यानं कामांना वेग आला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT