Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

Monsoon Rain : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने उन्हाच्या झळादेखील तापदायक ठरत आहेत. आज (ता. १६) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

Pune Weather Update : मॉन्सूनचे (Monsoon) आगमन लांबले असतानाच पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. मुंबई, कोकणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत.

राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने उन्हाच्या झळादेखील तापदायक ठरत आहेत. आज (ता. १६) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. गुरुवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरी येथे ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात तापमान ३६ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. राज्यात जोरदार वारे वाहत असून, अंशतः ढगाळ हवामान होत आहे.

तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे. मात्र उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

तापमानातील वाढीमुळे उन्हाच्या चटका उकाडा कायम आहे. आज (ता. १६) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३२.५ (२५.४), जळगाव ४०.७ (२७), धुळे ४०.५ (-), कोल्हापूर ३२.९ (२४.३), महाबळेश्‍वर २१ (१८.४), नाशिक ३३.५ (२५.३), निफाड ३४.४ (२६.२), सांगली ३४.५ (२४.२), सातारा ३२.२ (२५), सोलापूर ३८.९ (२४.८), सांताक्रूझ ३५.३ (२९.८), डहाणू ३४.३ (२८.४), रत्नागिरी ३२.९ (२५.५), छत्रपती संभाजीनगर ३६.८ (२२.७),

नांदेड - (२५.५), परभणी ३९.७ (२६), अकोला ४१.६ (२६.६), अमरावती ४१ (२६.१), बुलडाणा ३९ (२३.५), ब्रह्मपुरी ४२.२ (३०.२), चंद्रपूर ४२.८ (३०.२), गडचिरोली ४१.६ (२८.२), गोंदिया ४१.८ (२९), नागपूर ४१.९ (३०), वर्धा ४१.९ (३०), वाशीम ४१.२ (२३.६) यवतमाळ ४०.७ (२५.२).

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :
चंद्रपूर ४२.८, ब्रह्मपुरी ४२.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Measurement: मापदंड मोजणीचे

Agri Fertilizers Demand: एक लाख ९४ हजार टन खतांची मागणी

Farmer Protest: शेतीमालांवरील वायदे बंदी अन्यायकारक; आंदोलनाचा इशारा

Maharashtra Farmer Issue: अपग्रेडेशनच्या नावाखाली सात-बारा वितरण ठप्प

Godavari Irrigation Reform: थकबाकी वसुली, स्वायत्तता अजेंड्यावर

SCROLL FOR NEXT