Rain Update
Rain Update Agrowon
हवामान

Rain Update In Parbhani : परभणी जिल्ह्यातील १७ मंडलात मॉन्सूनपूर्व पाऊस

Team Agrowon

Weather Update : परभणी जिल्ह्यातील १७ मंडलात मंगळवारी (ता. २३) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. सेलू तालुक्यात सोमवारी (ता. २२) सायंकाळी झालेल्या पावसात वीज कोसळून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

वादळी वाऱ्यामुळे शेतातील आखाड्यावरील निवाऱ्यावरील पत्रे उडून गेले. काढणी सुरु असलेला भुईमुगाच्या शेंगा भिजल्या. शेतात वाळवत घातलेली हळद भिजली.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

परभणी जिल्ह्यात सोमवारी (ता. २२) सायंकाळी साडेपाच नंतर परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलात वादळी वारे, ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला.

परभणी तालुक्यातील परभणी ग्रामीण, पेडगाव, जांब, सिंगणापूर, पिंगळी, जिंतूर तालुक्यातील बोरी, चारठाणा, वाघी धानोरा, सेलू तालुक्यातील चिकलठाणा, मानवत तालुक्यातील केकरजवळा, ताडबोरगाव, पाथरी तालुक्यातील पाथरी,बाभळगाव, सोनपेठ तालुक्यातील आवलगाव, शेळगाव, पू्र्णा तालुक्यातील कात्नेश्वर या मंडलात हलका ते मध्यम पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT