Wildlife Conflict: जांभळी व कासारी खोऱ्यातील शिवारात गव्यांचा उपद्रव वाढला असून ऊस आणि भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. भाताचे तरवेही गव्यांकडून फस्त केले जात असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. दिवसभर शेतीची कामे आणि रात्री पिकांच्या राखणीसाठी जागता पहारा अशी वेळ शेतकऱ्यांवर आली असून त्यांना आर्थिक फटका बसत आहे..जांभळी व कासारी नदीवरील लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांमुळे परिसरात विविध पिकांची लागवड केली जाते. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने डोंगर भागात चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गव्यांचे कळप शिवाराकडे वळले असून ऊस व भात पिकांचे नुकसान वाढले आहे..Bison Gaur Crop Damage: गव्यांच्या उपद्रवामुळे शेती-बागायती संकटात.पिकांची राखण करताना गवे अंगावर धावून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात यापूर्वी गव्यांच्या हल्ल्यात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे वन विभागाने जंगलातच गव्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करून शिवारातील उपद्रव कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत..Bison Gaur Crop Damage: डेळेवाडी, गमेवाडीत रानगव्यांकडून नुकसान.गवे शिवारात येऊ नयेत यासाठी डोंगरातील जिवंत पाण्याचे झरे शोधून गव्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न वन विभागाकडून सुरू आहेत.- राजेंद्र रसाळ, वनपाल, बाजारभोगाव परिमंडल.दिवसभर शेती आणि रात्री पिकांच्या राखणीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. माझा ऊस दोन वेळा गव्यांनी खाल्ला; मात्र पहिल्या नुकसानीचीही भरपाई मिळालेली नाही. आम्ही जगायचे कसे? शासनाने गव्यांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाय करावा.- भरत भोगले, नुकसानग्रस्त शेतकरी, पोहाळवाडी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.