Land Acquisition: शक्तिपीठ महामार्ग झाला तर बाधित शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी- दसऱ्याऐवजी कायम शिमगाच साजरा होईल. ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई असून, या संघर्षात आम्ही तुमची ढाल बनून शेवटपर्यंत सोबत राहू, असा विश्वास विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला..करकंब येथे आयोजित शक्तिपीठ महामार्ग विरोधी सर्वपक्षीय शेतकरी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शेतकरी नेते राजू शेट्टी, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे, मारुती चव्हाण, बाळासाहेब देशमुख, वसंतराव देशमुख आदी उपस्थित होते..Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात वाळव्यातून १२७६ शेतकऱ्यांच्या हरकती.सतेज पाटील म्हणाले, टीईटीसारखी परीक्षा नीट घेता न येणारे सरकार शक्तिपीठ महामार्ग उभारण्याची भाषा करत आहे. कोल्हापूर येथील मोर्चाच्या दिवशीच शासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले. त्यामुळे या लढ्यात महिला, युवक आणि जनावरांसह रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले..मेळाव्यास जिल्हाभरातून हजारो शेतकरी उपस्थित होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. सर्वांनी ‘एक जिद्द - शक्तिपीठ रद्द’ अशा घोषणा असलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. विमल कुलकर्णी, डॉ. प्रियांका मगर व ज्योती पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महेश व्यवहारे यांनी, तर सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले..Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात विट्यात महिलांचा मोर्चा.कोण काय म्हणाले...राजू शेट्टी ः नवीन शक्तिपीठ महामार्ग उभारण्यापेक्षा विद्यमान रत्नागिरी-नागपूर मार्गाचे रुंदीकरण करावे. सिंचन प्रकल्पांना प्राधान्य द्यावे. संत सावता माळींचे अरण गाव उद्ध्वस्त होऊ देणार नाही. कायदेशीर आणि रस्त्यावरील लढा सुरू राहील. शेतकऱ्यांच्या भावना शासनाने दुर्लक्षित केल्यास आषाढी वारीत मुख्यमंत्र्यांचे वेगळ्या पद्धतीने स्वागत करू..गिरीश फोंडे (राज्य समन्वयक, शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती) ः विकासाचा केंद्रबिंदू माणूस असला पाहिजे. शेकडो शेतकरी कुटुंबांचे नुकसान करणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. हा केवळ महामार्गाचा नव्हे, तर शासनाच्या मानसिकतेचा प्रश्न असून, लोकशाहीत जनतेऐवजी ठेकेदारांसाठी काम करणाऱ्या धोरणाला विरोध राहील..धैर्यशील मोहिते-पाटील (खासदार, माढा) ः प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे कोणताही विकास तर होणारच नाही पण गावेच्या गावे भकास होणार आहेत. शासनाने अशा अनावश्यक प्रकल्पावर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना बारमाही पाणी आणि चोवीस तास वीज देण्यासाठी प्रयत्न करावा. त्यानंतर कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही. या लढ्यात शेवटच्या क्षणापर्यंत शेतकऱ्यांसोबत राहू..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.