Rain Update Agrowon
हवामान

Rain Forecast : विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Weather Update : राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे. आज (ता. ११) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. ११) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यातच सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सांगली येथे ३६.३, सातारा येथे पारा ३५.७ अंशांवर आहे.

किमान तापमानाचा पारा कमी अधिक होत असून, निफाड आणि जळगाव येथे पारा १० अंशांच्या खाली आहे. उर्वरित राज्यात १० ते २१ अंशांच्या दरम्यान आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे. आज (ता. ११) तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.६ (१२.४), धुळे ३०.० (९.५), जळगाव ३२.९ (१३.८), कोल्हापूर ३४.० (१९.६), महाबळेश्वर २९.१ (१७.०), मालेगाव २९.२ (१६.६), नाशिक ३०.९ (१३.९), निफाड ३१.२ (९.८), सांगली ३६.३ (१८.३), सातारा ३५.७ (१३.०), सोलापूर ३७.८(२१.०), सांताक्रूझ ३२.० (१७.७), डहाणू २७.९ (१९.५), रत्नागिरी ३२.७ (१७.६),

छत्रपती संभाजीनगर ३१.६ (१५.६), नांदेड ३२.४ (२०.०), परभणी ३२.७ (१८.३), अकोला ३२.० (१७.६), अमरावती ३१.८ (१५.९), बुलडाणा ३१.० (१५.६), ब्रह्मपुरी ३२.७ (१६.०), चंद्रपूर ३३.४ (१६.०), गडचिरोली ३०.६ (१४.८), गोंदिया २८.९ (१२.९), नागपूर २९.२(१६.०), वर्धा ३०.०(१६.२), वाशीम ३०.६ (१५.६), यवतमाळ ३२.५ (१८.२).

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

उत्तर भारतात थंडीचा कडाका

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. राजस्थान, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये थंड दिवस अनुभवायला येत आहे. शनिवारी (ता. १०) हरियानातील हिस्सार यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये किमान तापमान ५ ते १० अंशांच्या दरम्यान आहे. दक्षिण गुजरात आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. कर्नाटक किनाऱ्यापासून मध्य महाराष्ट्र ते दक्षिण गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’निवडणुकीत सुनेत्रा पवार पॅनेलची मुसंडी

Baramati KVK: कृषी विज्ञान केंद्र बारामतीला पुरस्कार

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

AI in Agriculture: ‘एआय’च्या मदतीने मराठवाड्यात एकरी १२५ टन ऊस

Soybean Price: अकोल्यात सोयाबीनचा सरासरी दर ६५०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT