Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert : पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Rain Update : अरबी समुद्र आणि बांगलादेशातील कमी दाब क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : अरबी समुद्र आणि बांगलादेशातील कमी दाब क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर बांगलादेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, ही प्रणाली पश्चिम बंगालकडे सरकत आहे. यातच अरबी समुद्रात कर्नाटक गोव्याच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते उत्तरेकडे सरकत आहे.

मॉन्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगरपासून, रोहतक, ओराई, सिधी, गया, कमी दाबाचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात उद्यापर्यंत (ता. २४) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याचे संकेत आहे.

गुरुवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे उच्चांकी ३५ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या वर आहे. ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी शिंपण करत आहे.

आज (ता. २३) कोकणातील रायगड येथे जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट), ठाणे, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची, तर उर्वरित राज्यात ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रत्नागिरी, पुणे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT