Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यात पुढील तीन दिवस पावसाच्या उघडिपीची शक्यता

Rain Forecast : पुढील दोन ते तीन दिवस पावसाची विश्रांती कायम राहण्याचा अंदाज आहे.

अमोल कुटे

Pune News : मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे गेल्यानंतर उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसाची विश्रांती कायम राहण्याचा अंदाज आहे.

सोमवारपासून (ता. १६) विदर्भात पुन्हा पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. आज (ता. १४) राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मध्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. यातच बंगालच्या उपसागरात बांगलादेशाच्या किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ही प्रणाली आणखी तीव्र होत पश्‍चिम बंगालकडे येण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून, कर्नाल, ठळक कमी दाबाचे केंद्र, बाराबंकी, पूर्णिया ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या केंद्रापर्यंत आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटकपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

पावसाने उघडिपीनंतर कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. आज (ता. १४) राज्यात पावसाची उघडीप शक्य असून, काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT