Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Weather News : राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा

Team Agrowon

Rain Orange Alert : पुणे : राज्यात कमजोर झालेला मॉन्सून पुन्हा जोर धरण्यास पोषक हवामान होत आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी बरसणार असून, आज (ता. १२) तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस सर्वसाधारण स्थितीवर पोहोचला असून, हा कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर पासून जयपूर, ओराई, बलिया, असनसोल, बागती ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात परस्पर विरोधी वाहणाऱ्या पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय झाले आहे.

गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात हलक्या ते अति जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. दोडामार्ग येथे १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात ऊन सावल्यांचा खेळात एखाददुसरी सर सुखावून जात आहे. पावसाची उघडीप असलेल्या ठिकाणी उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे.

राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. आज (ता. १२) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी तसेच पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग आणि नाशिक, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. पूर्व विदर्भात विजांसह पावसाची, उर्वरित ढगाळ हवामानासह राज्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.


अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT