Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भातील ७ जिल्ह्यांना गारपीटीचा ऑरेंज अलर्ट; खानदेश आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

Weather Forecast : हवामान विभागाने पुढील पाच दिवस आणखी काही भागात पावसाचा इशारा दिला.

Anil Jadhao 

Pune News : मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाने चांगलेच झोडपले. वादळी पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसानही झाले. तर गारपीटीचा तडाखाही बसला. हवामान विभागाने पुढील पाच दिवस आणखी काही भागात पावसाचा इशारा दिला. 

हवामान विभागाने विदर्भातील ७ जिल्ह्यांना गारपीटीचा ऑरेंज अलर्ट दिला. बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघडगर्जनेसह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला. तसेच यावेळी ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही देण्यात आला. 

यासोबच उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. याशिवाय पुणे, नाशिक आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे.  

उद्या म्हणजेच शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघडगर्जनेसह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला. तसेच यावेळी ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही देण्यात आला. तर उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तसेच पुणे, सांगली, सातारा, नाशिक, धुळे आणि नंदूरबाजार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. 

शनिवारी संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रविवारी पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. सोमवारीही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT