Monsoon Agrowon
हवामान

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

Maharashtra Weather : महाराष्ट्रावर आज आणि उद्या (ता.२७,२८) हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका अधिक राहील. मात्र मंगळवार (ता.२९) व बुधवारी (ता.३०) हवेचे दाब पुन्हा १००८ हेप्टापास्कल इतके कमी होतील.

 डॉ. रामचंद्र साबळे 

डॉ. रामचंद्र साबळे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर आज आणि उद्या (ता.२७,२८) हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका अधिक राहील. मात्र मंगळवार (ता.२९) व बुधवारी (ता.३०) हवेचे दाब पुन्हा १००८ हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्याच वेळी बंगालच्या उपसागरावरील हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. या हवामान स्थितीमध्ये महाराष्‍ट्रात ईशान्य मॉन्सूनचा प्रभाव कमी होईल. आणि ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ होईल. मात्र ईशान्य मॉन्सूनचा प्रभाव कर्नाटक, आंध्र व तमिळनाडू राज्यात काही काळ सुरूच राहील.

ईशान्य मॉन्सूनचा प्रभाव तमिळनाडूवर नोव्हेंबर व डिसेंबरमध्येही राहील. महाराष्ट्रातून ईशान्य मॉन्सून बाहेर पडल्याने वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन वारे वायव्येकडून वाहतील. सध्या सूर्याचे दक्षिणायन सुरू असल्याने वायव्येकडील वाऱ्यांचा प्रभाव कायम राहील. परिणामी थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने येतील. त्यामुळे किमान तापमान घसरण्यास सुरवात होईल. १ नोव्हेंबरच्या दरम्यान थंडीची चाहूल सुरू होईल. सकाळी थंड व दुपारी उष्ण हवामान राहील. धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर व सोलापूर या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १८ किमी राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

आज आणि उद्या (ता.२७,२८) सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील खरीप पिकांचे काढणीस व कापूस वेचणीस हवामान अत्यंत अनुकूल राहील. पावसात उघडीप असल्याने धान्य उन्हात वाळविण्यास हवामान अनुकूल राहील.

प्रशांत महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १६ अंश सेल्सिअस व इक्वॅडोरजवळ २१ अंश सेल्सिअस राहण्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव राहणार नाही. मात्र बंगालचे उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस राहण्यामुळे बाष्प निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरूच राहील. त्यातून ढगनिर्मिती होईल. हिंदी महासागराचीही स्थिती तशीच राहील.

कोकण

आज (ता.२७) सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्प पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात आज आणि उद्या (ता.२७,२८) पावसाची शक्यता नाही. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यामुळे किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८८ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ७४ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५२ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

आज उद्या (ता.२७,२८) धुळे, नाशिक व नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. या सर्व जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक व धुळे जिल्ह्यात ताशी १३ ते १४ किमी, तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ताशी ८ ते १० किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार जिल्‍ह्यात २३ अंश सेल्सिअस, धुळे व जळगाव जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ६२ टक्के, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ५१ ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ३५ टक्के, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २५ टक्के राहील.

मराठवाडा

धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता नाही. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव, लातूर व बीड या जिल्ह्यांत ताशी १६ ते १८ किमी, तर हिंगोली जालना, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी १३ ते १४ किमी राहील. नांदेड जिल्ह्यात ताशी वेग १० किमी राहील. कमाल तापमान लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, बीड, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ६३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते ३२ टक्के राहील.

पश्चिम विदर्भ

आज आणि उद्या बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा अमरावती जिल्ह्यात ईशान्येकडून, तर उर्वरित बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १३ किमी राहील. कमाल तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, बुलडाणा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस आणि अकोला जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३४ टक्के राहील.

मध्य विदर्भ

यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात वायव्येकडून, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४५ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत आज आणि उद्या पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वायव्येकडून, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ११ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५०टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत आज आणि उद्या पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात ताशी १६ ते १८ किमी, तर सांगली जिल्ह्यात ताशी १४ किमी राहील. कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर पुणे व सातारा जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस व सोलापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर सोलापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ५० टक्के राहील.

कृषी सल्ला

पूर्वहंगामी उसाची लागवड १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.

हरभरा पिकाची पेरणी करावी.

कांदा लागवडीसाठी गादीवाफ्यावर रोप तयार करावे.

खरिपातील सोयाबीन, मका, भुईमूग पिकांची काढणी करावी.

जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून आफ्रिकन टॉल मक्याची पेरणी करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT