वाढत्या थंडीमध्ये कमी तापमान व कमी आर्द्रतेमुळे बागेत भुरीची शक्यता वाढते. तसेच वाटाण्याच्या आकाराचे हिरवे मणी तडकणे अशा समस्या दिसून येतात. त्यासाठी कडाक्याच्या थंडीत बागेत भुरी नियंत्रणासह उष्णता राखण्यासाठी उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे.अरबी समुद्रामधून येणारे हलके वारे ढग घेऊन येत आहेत. त्यामुळे आजपासून शनिवार ते रविवारपर्यंत (ता.६ ते ७) राज्यातील द्राक्ष विभागामध्ये हवामान कमी जास्त प्रमाणात ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली सोलापूर भागात सर्व दिवस, तर नाशिक भागात १ ते २ दिवस हवामान ढगाळ राहील..सध्या बहुतांश सोशल मीडियावर सांगली, सोलापूर या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सध्यातरी द्राक्ष विभागामध्ये पावसाची शक्यता फार कमी दिसते. ढगाळ वातावरणामुळे काही दिवस तापमानात आणि सापेक्ष आर्द्रतेमध्ये थोडी वाढ मात्र निश्चित होईल. उत्तर भारतामध्ये एका पाठोपाठ एक असे तीन कमी जास्त प्रभावाचे WD (वेस्टर्न डिस्टर्बन्स) येत आहेत. त्यांच्या प्रभावाने हिमालयामध्ये बर्फवृष्टी झाली व उत्तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडून येणारे वारे आता ही थंडी महाराष्ट्रामध्ये घेऊन येतील..Grape Farming Registration: द्राक्ष निर्यातीसाठीच्या शेतकरी नोंदणीला सांगलीत प्रारंभ.द्राक्ष विभागामध्ये शनिवार, रविवारनंतर (ता.६, ७) ढगाळ हवामानाची स्थिती संपुष्टात येऊन पुढे काही दिवस वातावरण निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील सोमवार (ता.८) नंतर सर्व द्राक्ष विभागांमध्ये हळूहळू थंडीच्या तीव्रतेमध्ये वाढ होत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्याच्या तापमानात सर्वसाधारणपणे २ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः नाशिक विभागामध्ये न्यूनतम तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी होईल. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या (WD) प्रभावानुसार डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मध्य भारतामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे द्राक्ष बागायतदारांचे लक्ष देणे जरुरीचे आहे..पुढील सोमवारनंतर (ता.८) येणारी थंडीची लाटेची तीव्रता सध्यातरी सांगता येणे शक्य नाही. परंतु आकाश जेव्हा निरभ्र असते, तेव्हा पहाटेच्या वेळी तापमानात वेगाने घट होते. काही ठिकाणी तापमान नोंद झालेल्या तापमानापेक्षा जास्त घट झालेली दिसून येते. उतारावरील बागा, नदीच्या किनाऱ्यावरील किंवा पाणथळावरील बागा असलेल्या ठिकाणी वारे मुक्तपणे वाहत नाहीत. तेथे पहाटेच्या वेळी अत्यंत थंड वातावरण केंद्रित होते..Grape Farming: रोग नियंत्रणाची एकात्मिक रणनिती वाचवेल खर्च.अशावेळी तेथील बागेतील कॅनोपीतील तापमान जास्त कमी होते. हे कमी झालेले तापमान बागेत फार थोडावेळ जरी राहत असले तरीही बागेचे नुकसान होते. वाढत्या थंडीमध्ये घडामधील वाटाण्याइतक्या आकाराचे हिरवे मणी तडकणे अशा समस्या दिसून येतात. हवामानविषयक अंदाज आपल्याला वेळेच्या आधी प्राप्त होत असल्याने कडाक्याच्या थंडीत बागेची घ्यावयाची काळजी आणि अपेक्षित उपाय केल्यास अधिक फायद्याचे ठरेल..थंडीपासून करावयाचे उपायनिरभ्र आकाश आणि जास्त थंडी या दोन्ही बाबी विचारात घेऊन रात्री १२ वाजल्यानंतर बागेजवळ शेकोटी पेटवावी. शेकोटी वेलींपासून दूर असावी. जेणेकरून शेकोटीच्या उष्णतेपासून जवळच्या ओळीतील पाने सुरक्षित राहतील. शेकोटी केल्यामुळे पहाटेच्या कमी झालेल्या तापमानात बागेत काहीकाळ उष्णता निर्माण होऊन संभाव्य नुकसान टाळले जाईल. मणी तडकण्या व्यतिरिक्त तापमान जास्त कमी झाल्यास हिरवे मणी असलेला घड करपून जाण्याची शक्यता असते. म्हणूनच थंडीची तीव्रता पाहून शेकोटी करण्याचा निर्णय घ्यावा..Grape Farming Loss: जुन्नर तालुक्यात ४०० एकर द्राक्षबागांवर कुऱ्हाड.अन्नद्रव्ये कमतरताथंडीच्या दिवसांत कॅल्शिअम व मॅग्नेशिअम कमतरता जाणवते. कॅल्शिअम कमतरतेमुळे मणी लवकर तडकू शकतात. त्यामुळे थंडी वाढण्याच्या आधी योग्य फवारण्या घेऊन कॅल्शिअम कमतरतेमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळले जाईल, याची दक्षता घ्यावी.क्लोराईड टॉक्सिसिटी होऊ शकते, या शक्यतेमुळे किंवा भीतीमुळे कॅल्शिअम क्लोराईडचा वापर टाळला जातो. बागेमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये क्लोराईड उपलब्ध नसल्यास कॅल्शिअम क्लोराईड (०.२ टक्के) ची फवारणी केल्यास कॅल्शिअम उपलब्धतेसह भुरीवर चांगले नियंत्रण मिळू शकते. बागेमध्ये जैविक नियंत्रणाचा वापर यशस्वीरीत्या करण्यास अशा फवारणीचा उपयोग होतो..प्लॅस्टिक कव्हरचा वापर फायदेशीरप्लॅस्टिक कव्हर खाली लावलेल्या बागांचे थंडीपासून चांगले संरक्षण होते. सूर्य प्रकाशातून येणारी उष्णता सकाळी बागेत प्लॅस्टिकमधून येते. रात्रीच्या वेळी इन्फ्रा रेड किरणांद्वारे परत आकाशात जाणारी उष्णता प्लॅस्टिक कव्हर थांबवून ठेवते. त्यामुळे प्लॅस्टिक कव्हरचा वापर केलेल्या बागेत पहाटेच्या वेळी तापमान जास्त कमी होत नाही..Grape Farming: ‘क्लास वन’ अधिकाऱ्याच्या पगारासारखी फायदेशीर शेती .थंडीच्या दिवसांत प्लॅस्टिक कव्हरचा वापर केलेल्या बागेत भुरीचा प्रादुर्भाव जास्त तीव्रतेने वाढू शकतो. परंतु अँपिलोमायसेसची फवारणी केल्यास जैविक नियंत्रण होते. त्यामुळे पुन्हा बुरशीनाशकांचा वापर करणेजरुरी नसते. ज्या द्राक्ष पट्ट्यात दरवर्षी थंडीची तीव्रता जास्त असते, तेथे प्लॅस्टिक कव्हरचा वापर फायदेशीर ठरतो..भुरी नियंत्रणकमी तापमान व कमी आर्द्रतेमुळे बागेतील भुरीची शक्यता वाढते. बाग फुलोऱ्यात असताना भुरीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी योग्य ठरते. थंडीच्या दिवसात विशेषतः ट्रायाझोल गटातील आंतरप्रवाही बुरशीनाशके वापरणे फायद्याचे असते. कारण ही बुरशीनाशके भुरीच्या नियंत्रणाबरोबर शेंड्याची वाढ मंदावतात. व आंतरिक जिबरेलिक ॲसिड (GA) कमी करून घडांच्या प्राथमिक वाढीस मदत करतात. परंतु छाटणीनंतर ५५ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असल्यास भुरीसाठी वापरल्या जाणाऱ्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर थांबवणे आवश्यक आहे. कारण उर्वरित अंशांचा (रेसिड्यूचा) धोका वाढण्याची शक्यता असते. .Grape Farming: कडवंचीचे द्राक्ष आगार ‘जर-तर’च्या फेऱ्यात.परंतु त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर झाल्यास जैविक नियंत्रणासाठी बुरशींचा वापर करण्यास अडथळा होतो. या ऐवजी सल्फर (०.२ टक्का डब्ल्यूडीजी/एल) वापरल्यास भुरीवर चांगले नियंत्रण मिळते. तसेच जैविक नियंत्रणासाठी बुरशींचा वापर शक्य होतो. मणी छोटे असताना केलेल्या सल्फरच्या फवारणीमुळे मण्यांवर सल्फरच्या डागांचा धोका राहत नाही. वास्तविकता डब्ल्यूजी किंवा डब्ल्यूडीजी (WG किंवा WDG) फॉर्म्यूलेशन आल्यापासून तसेच अद्ययावत फवारणीच्या यंत्रे उपलब्ध झाल्यापासून सल्फरच्या डागांचा धोका फारसा राहिलेलाच नाही. सल्फर (१०, ००० पीपीएम) पर्यंत सुद्धा जैविक नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या बुरशींवर देखील संपूर्णपणे प्रभावी ठरत नाही..सध्याच्या थंडीच्या दिवसांत अँपिलोमायसेस बुरशी भुरीवर चांगले नियंत्रण करते. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये भुरीसाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर केला जातो. परंतु या वर्षी थंडी लवकर सुरु झाल्यामुळे अँपिलोमायसेसची फवारणी बागेत न करता बागेच्या आजूबाजूस असलेल्या झाडांवर भुरी दिसल्यास त्यावर करावी. सद्यःस्थितीत बागेच्या आजूबाजूस भुरीचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात झाली असल्याचे बहुतांश बागायतदारांकडून समजते आहे. त्यावर अँपिलोमायसेसची फवारणी जरूर घ्यावी. पुढील काही दिवसांत येणाऱ्या कडाक्याच्या थंडीत त्याचा चांगला उपयोग होईल.मण्यांची सेटिंग झालेल्या आणि भुरीसाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर थांबविला असलेल्या बागेत अँपिलोमायसेसचा वापर करणे शक्य आहे..कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा. - डॉ. एस. डी. सावंत ९३७१००८६४९(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचेनिवृत्त संचालक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.