Jalgaon News: केळीवर कुकुंबर मोझॅक विषाणूनंतर (सीएमव्ही) करपा रोग सक्रिय झाला आहे. जशी थंडी वाढेल, तशी या रोगाची तीव्रतादेखील अधिक होईल. यामुळे केळी उत्पादकांचे नुकसान वाढत आहे. दुसरीकडे करपा निर्मूलन मोहीम, जनजागृतीचे काम कृषी विभागाने जणू बंद केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. .दरवर्षी करपा येतो, पण कृषी विभाग सर्व जबाबदारी शेतकरी, वातावरणावर ढकलून नामनिराळा होतो. करपा निर्मूलनासाठी केळी उत्पादकांना बुरशीनाशके व कीडनाशकांचे किट अनुदानावर दिले जात होते. हेक्टरी सुमारे चार हजार रुपये अनुदान होते. परंतु हे अनुदान मिळत नाही. यासाठी केळी उत्पादकांनी सातत्याने मागणी केली. परंतु त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना पदरमोड करून निधी उभारावा लागत आहे. त्यात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे..Banana Crop Disease: केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव.विविध कंपन्या याचा लाभ घेत असून, करपा निर्मूलनासाठीच्या विविध बुरशीनाशके, कीडनाशकांची चलती बाजारात आहे. त्यांचा किती प्रभाव, उपयोग होत आहे याबाबत कृषी विभागाकडे कोणतेही दावे, माहिती नाही. शेतकरी कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे जाऊन बुरशीनाशके, कीडनाशके आणत आहेत. तसेच काही विद्राव्य खतेही कृषी केंद्रचालक शेतकऱ्यांना नको असताना चुकीची माहिती देऊन देत आहेत. यामुळे वित्तीय नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. करपा निर्मूलन मोहिमेत कृषी विभाग कुठेही दिसत नाही. कृषी सहायक गावोगावी फिरत नाहीत, अशाही तक्रारी शेतकरी करीत आहेत..Banana Fungal Disease : केळीपट्ट्यात टीआर-४ बुरशीचे आव्हान.करपा रोगाची समस्या सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागात आहे. या भागांत करपा निर्मूलनासंबंधी कार्यवाहीची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..संशोधन केंद्राकडून प्रयत्नजळगाव येथील केळी संशोधन केंद्र करपा निर्मूलनासंबंधी कार्यरत आहे. केंद्रातर्फे रावेर, यावल, मुक्ताईनगरसह इतर भागांत जनजागृती, शिबिरे घेतली जातात. परंतु खानदेशात सर्वत्र पोहोचणे या केंद्रातील तज्ज्ञांना कमी मनुष्यबळ व इतर अडचणींमुळे शक्य नाही. कृषी विभागाचे प्रत्येक गावात कृषी सहायक नियुक्त आहेत. तसेच पर्यवेक्षक, मंडल अधिकारी व कृषी अधिकारी अशी यंत्रणा आहे. शिवाय अनेक खासगी, स्वयंसेवी संस्थांशी थेट कृषी विभागाचा संपर्क आहे. यात कृषी विज्ञान केंद्रांचीदेखील मदत घेता येऊ शकते. यातून करपा निर्मूलन मोहिमेला गती येईल व शेतकऱ्यांना निविष्ठा, कार्यवाहीची योग्य, तांत्रिक माहिती देता येईल, असे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.