Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon Update : महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रगती

Monsoon News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आपला प्रवास सुरू ठेवला आहे. शनिवारी (ता. ८) रत्नागिरी, सातारा, सोलापूर जिल्ह्यांच्या आणखी काही भागांत चाल करतानाच पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आपला प्रवास सुरू ठेवला आहे. शनिवारी (ता. ८) रत्नागिरी, सातारा, सोलापूर जिल्ह्यांच्या आणखी काही भागांत चाल करतानाच पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. पुढील दोन दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाची मॉन्सून एक्स्प्रेस मोठ्या दिमाखात महाराष्ट्रात दाखल झाली. गुरुवारी (ता. ६) नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये मजल मारली आहे.

चार दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात डेरेदाखल झालेल्या मॉन्सूनची शुक्रवारी (ता.७) प्रगती झाली नव्हती. शनिवारी (ता.८) राज्याच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने वाटचाल केली आहे. महाराष्ट्रातील हर्णै, बारामती ते तेलंगणातील निजामाबादपर्यंत मॉन्सूनने मजल मारली आहे.

केरळमध्ये वेळेआधी (३० जून) दाखल झाल्यानंतर गुरुवारी (ता. ६) मॉन्सूनने गोव्याचा उर्वरित भाग, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणाच्या बहुतांश भागासह महाराष्ट्रात प्रगती केली. चार दिवस आधीच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पोहोचलल्या मॉन्सूनची प्रगती सुरूच आहे.

शनिवारी (ता. ८) रत्नागिरी, सातारा, सोलापूर जिल्ह्यांच्या आणखी काही भागांसह पुणे, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत मोसमी वारे पोहोचले आहे. वाटचालीस पोषक हवामान असल्याने मध्य अरबी समुद्र, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भागासह तेलंगणामध्ये मॉन्सूनची प्रगती शक्य आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT