Monsoon Rain : वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

Rain Update : नाशिक जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या अगोदरच वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. चांदवड, मालेगाव, सटाणा व नांदगाव तालुक्यांत पावसामुळे नुकसान झाले आहे.
Rain damage
Rain damageAgrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या अगोदरच वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. चांदवड, मालेगाव, सटाणा व नांदगाव तालुक्यांत पावसामुळे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता. ५) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह काही भागांत पाऊस झाला. या वादळाने पत्रे उडाल्याने घरांचे नुकसान झाले असून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. मात्र जोरदार पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

चांदवड तालुक्यात बुधवारी (ता. ५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील दरसवाडी, शिंगवे, मेसनखेडे, डोणगाव, तळवाडे, गणूरसह अनेक गावांत चांगला पाऊस होऊन शेतात पाणी साचले होते. नदी नाल्यांमध्ये पाणी वाहिल्याने शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे.

Rain damage
Pre-Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाने विविध जिल्ह्यांना झोडपले; पिकांना फटका

चांदवड-गणूर रोडवरील मनोज कोतवाल यांच्या गाईंच्या गोठ्याचे अन् मजुरांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले. भिंती खचल्याने घरातील साहित्याचे तसेच घरातील धान्य, कपडे इतर घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले. मुंबई-आग्रा महामार्गावर कॉलेज रोडवर असलेल्या पुलाखाली पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले.

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे मंगळवारी (ता. ४) संध्याकाळी पावसाने हजेरी लावली होती. इंदिरानगर येथील ज्योती निकम यांच्या घराचे पत्रे उडाल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला. जळगाव शिवारात झाडे पडली तर विजेचे अनेक खांब वाकले. निकम यांच्या राहत्या घरातील २२ पत्र्यांचा साठा उडून गेला.

Rain damage
Pre Monsoon Rain : राज्यातील विविध भागांत पूर्वमोसमी पावसाचा जोर

त्यातच पावसामुळे संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वादळामुळे ग्रामीण रुग्णालयाजवळ तीन, जुने जळगाव शिवारातील सुरेश निकम यांच्या शेतालगत वीज वितरण कंपनीचे तीन ते चार खांब वाकले आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दाभाडी शिवारात विजय त्र्यंबक देवरे यांचे शेडनेटही जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले.

बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव परिसरात सायंकाळी झालेल्या पावसाने शिवारात पाणी साचले होते. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले तर विजेच्या तारा तुटून पडल्याने गावातील व शेतीशिवारातील वीजपुरवठा खंडित झाला. अनेक मोठ्या झाडांच्या फांद्या मोडून रस्त्यावर पडल्या होत्या. महावितरणचे जनमित्र वरिष्ठ तंत्रज्ञ गोरख निकम, विकी ठाकरे यांनी शेतीशिवारातील वीजपुरवठा सुरळीत सुरू केला. मनमाड शहर परिसरात दुपारनंतर अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com