Rain Update  Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सून १९ मे रोजी अंदमानात येणार

Latest Monsoon News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाची वर्दी मिळाली आहे. अंदमान-निकोबार बेट समुहावर मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे.

अमोल कुटे

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाची वर्दी मिळाली आहे. अंदमान-निकोबार बेट समुहावर मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे. रविवारपर्यंत (ता. १९) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, लगत असलेल्या आग्नेय बंगालच्या उपसागर आणि निकोबार बेटांवर दखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: २१ मे पर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. तर १ जूनपर्यंत केरळमध्ये मॉन्सून डेरेदाखल होतो.

यंदा १९ मे रोजी मॉन्सून अदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षीदेखील १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर आगमन लांबल्याने ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून ११ जून रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकणात पोचला होता.

यंदा नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे.

सध्या प्रशांत महासागरात सध्या एल-निनो स्थिती असून, मॉन्सून हंगामात ला-निना स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचा मुहूर्त हवामान विभागाकडून लवकरच जाहीर केला जाईल. तसेच मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामाचा सुधारीत दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.

यंदाचा उन्हाळा सुरुवातीपासून तप्त राहीला. गतवर्षीपेक्षा पाणीटंचाईत भर पडली. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. मे महिन्यामध्ये अतिष्णतेमुळे उन्हाळी पिकांची होरपळ झाली. त्यात मार्चचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पूर्वमोसमी वादळी पाऊस झाला. त्यामुळे उष्णतेपासून सुटका होऊन दिलासा मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा

Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

SCROLL FOR NEXT