Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा

Rain Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Pune News : पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने राज्यात उन्हाचा चटका कमी झाला आहे. आज (ता. १३) राज्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Rain Update
Weekly Weather : पूर्वमोसमी पावसाला सुरुवात; तापमानात घट

शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळपासूनच असलेल्या ढगाळ आकाशामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील जेऊर येथे देशातील उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दक्षिण कर्नाटक आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर पूर्व मध्य प्रदेशपासून, विदर्भ, मराठवाडा, अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज (ता. १३) राज्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Rain Update
Pre Monsoon Rain : राज्याच्या पश्‍चिम भागाला पावसाचा तडाखा

रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.८, धुळे ४०, जेऊर ४३.५, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्‍वर २८.७, मालेगाव ४१, नाशिक ३७.३, निफाड ३९.२, सांगली ३९.६, सातारा ३८.२, सोलापूर ४२.३, सांताक्रूझ ३३.९, डहाणू ३४.५, रत्नागिरी ३४, छत्रपती संभाजीनगर ३९.६, नांदेड ४०.४, परभणी ४१.१, अकोला ४२.५, अमरावती ४१, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४०.९, चंद्रपूर ४२, गडचिरोली ३९.२, गोंदिया ३८.२, नागपूर ३८.१, वर्धा ४१.५, वाशीम ४१.४, यवतमाळ ४०.

वादळी, गारपिटीचा पावसाचा इशारा. (ऑरेंज अलर्ट)

नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com