Monsoon Rain  agrowon
हवामान

Monsoon Rain : माॅन्सूनचा प्रवास सुसाट; पावसाचाही अंदाज; राज्यातील अनेक भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज

Weather Update : विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनने आज देशाच्या आणखी काही भागात प्रगती झाली. तर राज्याच्या अनेक भागात पुढील ४ दिवस राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

आज कोकणातील सिंधुदूर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा, संपूर्ण विदर्भ आणि खानदेश तसेच मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यातील इतर भागातही हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे. 

उद्या आणि रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रताली घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाचा येलो अलर्ट आहे. तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. सोमवारी आणि मंगळावारीही हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर मराठवाडा आणि खानदेश ठिकठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज दिला. 

माॅन्सूनची वाटचाल कायम असून आज अनेक भागात माॅन्सून पोचला. माॅन्सूनने आज संपूर्ण दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तराखंड आणि बिहार व्यापला. तर राजस्थान, हरियाना, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग व्यापला. माॅन्सूनची सिमा आज जैसलमेर, चूरू, भिवाणी, दिल्ली, अलिगड, कानपूर, गाझीपूर, गोंडा, खेरी, मोरादाबाद, देहरादून, उना, पठाणकोट आणि जम्मू भागात होती. 

माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसात माॅन्सून हरियाना, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मूचा उर्वरित भाग व्यापेल. तसेच राजस्थानच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT