Monsoon Agrowon
हवामान

Monsoon 2024 : मॉन्सूनने देश व्यापला

Monsoon Rain : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २) सर्व भूभाग कवेत घेत देश व्यापला आहे. यंदा केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल ६ दिवस अगोदर देश व्यापला आहे.

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २) सर्व भूभाग कवेत घेत देश व्यापला आहे. यंदा केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल ६ दिवस अगोदर देश व्यापला आहे. जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी ८९ टक्के पाऊस झाला असून, आता देशात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

यंदा मॉन्सूनची वाटचाल काहीशी वेगवान झाल्याचे दिसून आले. १९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालेल्या मॉन्सूनच्या वाटचालीवर ‘रेमल’ चक्रीवादळाचा प्रभाव पडला. त्यामुळे मॉन्सूनने बंगालच्या उपसागर आणि पूर्वोत्तर राज्यात वेगाने वाटचाल केली. केरळमध्ये दोन दिवस आधी (३० मे) दाखल होणाऱ्या मोसमी वाऱ्यांनी ३१ मे रोजी तब्बल ६ दिवस आधीच पूर्वोत्तर राज्यात हजेरी लावली.

त्यानंतर अरबी समुद्रातून वाटचाल करणाऱ्या मॉन्सूनची उपसागरातील वाटचाल २० दिवस थांबली होती. अरबी समुद्रातून मात्र वाऱ्यांची वाटचाल सुरूच होती. यंदा ६ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर २३ जून रोजी मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला. दरम्यान, बंगालच्या उपसागरावरूनही मॉन्सूनने केली.

मजल दरमजल प्रवास करून मोसमी वारे मंगळवारी (ता. २) संपूर्ण देशात दाखल झाले. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर १ महिना आणि तीन दिवसांत संपूर्ण देशात मजल मारली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून पूर्वोत्तर राज्यातील मणिपूरपर्यंत सक्रिय असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT