Monsoon Update : महाराष्ट्रात मॉन्सून दाखल

Rain Update : महाराष्ट्रावर रविवारपासून (ता. ९) ते मंगळवार (ता. ११) पर्यंत हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. हा हवेचा दाब मॉन्सून वेगाने पुढे सरकण्यास अत्यंत अनुकूल आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon
Published on
Updated on


डॉ. रामचंद्र साबळे

Rain Update : महाराष्ट्रावर रविवारपासून (ता. ९) ते मंगळवार (ता. ११) पर्यंत हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. हा हवेचा दाब मॉन्सून वेगाने पुढे सरकण्यास अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे नैर्ऋत्‍य मॉन्सूनच्या शाखेसह बंगालच्या उपसागरावरही हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होत आहेत. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर १००० हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब राहतील. तसेच हिमालयाच्या पायथ्यास ९९८ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब राहतील. त्यामुळे मॉन्सून वारे वेगाने उत्तर भारताच्या दिशेने तसेच ईशान्य भारत व वायव्य भारताच्या दिशेने प्रगती करतील. त्यामुळे मॉन्सून निर्धारित वेळेपूर्वी भारतातील सर्व भागांत दाखल होईल.

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होईल. किमान तापमान सर्व जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन वारे नैर्ऋत्येकडून वाहतील.
मॉन्सून आगमनाचे कालावधीत वाऱ्याच्या वेगात वाढ होईल. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. मॉन्सून आगमनाच्या वेळी विजांचे कडकडाट व ढगांचे गडगडाट जाणवतील. या काळात विजा पडण्याचे प्रकार अधिक जाणवतील. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Monsoon Update
Monsoon Update : ‘मॉन्सून एक्स्प्रेस’ महाराष्ट्रात दाखल

पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान प्रशांत महासागराच्या पेसजवळ १६ अंश सेल्सिअसपर्यंत, तर इक्वॅडोरजवळ २५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. यावरून ‘ला-निना’चा प्रभाव सुरू झाल्याचे दिसून येते. हिंदी महासागराच्या व बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असून ते अनुकूल आहे.

कोकण ः
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन ९ ते १० मिमी, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ५ मिमी, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत १ ते २ मिमी पावसाची शक्यता आहे. पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्व जिल्ह्यांत ताशी १० किमी राहील. कमाल तापमानात घसरण होईल. कमाल तापमान रायगड जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर पालघर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यात पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ८० ते ८५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के इतकी राहील.

उत्तर महाराष्ट्र ः
नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण साधारणच राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ताशी २३ किमी, तर जळगाव जिल्ह्यात ताशी २० किमी आणि नाशिक जिल्ह्यात ताशी १७ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के राहील.

मराठवाडा ः
आज (ता. ९) परभणी जिल्ह्यात ३४ मिमी, लातूर जिल्ह्यात २४ मिमी व हिंगोली जिल्ह्यात २३ मिमी, तर धाराशिव व नांदेड जिल्ह्यांत ५ मिमी, बीड जिल्ह्यात १२ मिमी, जालना व संभाजीनगर जिल्ह्यात १ ते २ मिमी पावसाची शक्यता आहे. त्यापुढील काळातही पाऊस होईल. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २० ते २२ किमी राहील. धाराशिव जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १९ किमी तसेच जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी १८ किमी राहील. कमाल तापमान हिंगोली जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर नांदेड जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. परभणी, धाराशिव, जालना व संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर बीड जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, परभणी जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर जालना, लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, बीड व हिंगोली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः
कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के, तर दुपारची ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २१ ते २३ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. आज (ता. ९) प्रत्येक जिल्ह्यात २ ते ३ मिमी पावसाची शक्यता आहे.

मध्य विदर्भ ः
आज (ता. ९) यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत २० ते २१ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, नागपूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आद्रता ४० ते ५१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २१ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः
आज (ता. ९) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २ ते ३ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ताशी १४ किमी, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ताशी ८ ते ११ किमी राहील. कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४२ टक्के, तर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत ५० ते ६२ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते २५ टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र ः
आज (ता. ९) सोलापूर जिल्ह्यात ५० मिमी, सातारा व सांगली जिल्ह्यांत २६ ते २९ मिमी, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांत १० ते ११ मिमी आणि नगर जिल्ह्यात २.६ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १५ किमी राहील. कमाल तापमान सोलापूर, पुणे, नगर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर सातारा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १५ टक्के राहील.

कृषी सल्ला ः
- पीक लागवड नियोजनानुसार निविष्ठांची उपलब्धता करावी.
- चांगला पाऊस होऊन जमिनीत वाफसा आल्यानंतरच पीक पेरणीचे नियोजन करावे.
- विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने, जनावरांसाठी सुरक्षित निवाऱ्याची सोय करावी.
- पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी सारे व पाट काढावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com