Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon 2024 : मॉन्सून १९ मे रोजी अंदमानात दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज

नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सून १९ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबारमध्ये पोहचणार असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं अंदाज व्यक्त केला आहे.

Dhananjay Sanap

नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सून १९ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबारमध्ये पोहचणार असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं अंदाज व्यक्त केला आहे. साधारण २१ मे रोजी मॉन्सून अंदमानमध्ये दाखल हॉट असतो. परंतु यंदा मात्र अंदमानमध्ये दोन दिवस आधी मॉन्सून दाखल होणार आहे. दक्षिण अंदमान समुद्र जवळच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि निकोबारमध्ये मॉन्सून दाखल होण्यासाठी अनुकूल हवामान असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

मॉन्सून दरवर्षी साधारणत: १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर ८ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो. २०२३ मध्ये मॉन्सून एक आठवडा उशिरा पोहचला होता. परिणामी मॉन्सून तळकोकणात १६ जून उजडावा लागला होता. दरवर्षी साधारण १९ मे रोजी दक्षिण अंदमानमध्ये दाखल होतो.

सध्या राज्यात पूर्वमोसमी पावसानं धुमाकूळ घातला आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना मॉन्सूनच्या आगमनाची आतुरता आहे. यंदा हवामान विभागानं पहिल्या अंदाजात मॉन्सून हंगामात सरासरी १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्यावर्षी मॉन्सून हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. गेल्यावर्षी मॉन्सूनवर एल निनोचा परिणाम झाला. त्यामुळे देशात पावसाचे मोठे खंड पडेल. देशातील बहुतांश भागाला दुष्काळाचा सामना करावा लागला. खरीप आणि रब्बी हंगामाला मोठा फटका बसला. शेतमाल उत्पादनात घट आली. परंतु यंदा मात्र जून महिन्यात एल निनो स्थिती निवळून ला निना स्थिती तयार होणार अंदाज हवामान विभागानं दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : जमीन आरोग्य जपल्यास भारतातही ब्राझीलइतकी कापूस उत्पादकता

Ragi Cultivation : नाचणी पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

Shaktipeeth Highway Protest : ‘शक्तिपीठ’ नको, आमची शेतीच हवी

Solar Project : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात दहा सौर प्रकल्प

Dattatray Bharane : क्रीडा खात्याचे बरे होते, लय त्रास नव्हता; आता त्रास घ्यावाच लागेल

SCROLL FOR NEXT