Monsoon Agrowon
हवामान

Monsoon : मॉन्सून देशातून परतला

Monsoon Update : शेतीप्रधान भारतासाठी वरदान ठरलेल्या नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदाच्या हंगामात देशाचा निरोप घेतला आहे.

Team Agrowon

Pune News : शेतीप्रधान भारतासाठी वरदान ठरलेल्या नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदाच्या हंगामात देशाचा निरोप घेतला आहे. यंदाच्या हंगामात देशभरात दमदार बरसलेल्या मॉन्सूनने परतीच्या काळात मुक्त हस्ते पर्जन्य वर्षाव केला. मॉन्सून महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून माघारी जाताच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने मंगळवारी (ता. १५) जाहीर केले.

मध्य बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिण द्वीपकल्प, दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरात पूर्व आणि ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह, तसेच तमिळनाडू, पुदुच्चरी, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, रायलसीमा आणि केरळ राज्यात सुरू असलेला पाऊस या नोंदीच्या आधारे नैर्ऋत्य मोसमी वारे परतून, ईशान्य मोसमी वाऱ्याचा हंगाम सुरू झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

३० मे रोजी केरळमध्ये दाखल झालेल्या मॉन्सून ६ जून रोजी महाराष्ट्रात पोचला. २४ जून रोजी संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर मजल दरमजल करत २ जूलै रोजी देशात सर्वदूर मॉन्सून दाखल झाला. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर यंदा तब्बल ४ महिने १६ दिवस देशात मुक्काम केला.

मोसमी वाऱ्यांनी २३ सप्टेंबर रोजी वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला. ५ ऑक्टोबर रोजी मॉन्सूनने उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागांतून माघार घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील वाटचाल अडखळल्यानंतर सोमवारी (ता. १४) पूर्वोत्तर राज्यातून मॉन्सून परतला. मंगळवारी (ता. १५) मॉन्सूनने यंदाचा परतीचा प्रवास पूर्ण करून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला अलविदा केला. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वाऱ्यांचा पाऊस सक्रिय झाला आहे.

उपसागरातील कमी दाबाची तीव्रता वाढतेय

अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) ओमानच्या किनाऱ्याकडे सरकून गेले आहे. तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. ही प्रणाली ठळक होऊन, तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidarbha Heat Wave: विदर्भातील तीन जिल्ह्यांत अति उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Banana Variety Selection: कमी पावसातील लागवडीसाठी केळीचा कंद निवडताना काय तपासावे?

Cotton Cultivation: अकोल्यात कपाशीच्या लागवडीत वाढीची शक्यता

Online RTI Portal: क्षेत्रीय कार्यालयांतही ऑनलाइन माहिती अधिकार

Petrol Diesel Shortage: पेट्रोल- डिझेलचा साठा, मग पंपांवर रांगा का?; मुख्यमंत्री फडणवीसांनी खरं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT