Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023: माॅन्सूनची सोलापूर, उदगीर, नागपूरपर्यंत मजल!

Today Monsoon Update : माॅन्सूनने आज देशातील अनेक भागात प्रगती केली. राज्यातही काही भागांमध्ये माॅन्सून दाखल झाला. माॅन्सूनने आज राज्यातील सोलापूर, उदगीर आणि नागपूरपर्यंत मजल मारली.

Team Agrowon

Monsoon Rain Update : माॅन्सूनने आज देशातील अनेक भागात प्रगती केली. राज्यातही काही भागांमध्ये माॅन्सून दाखल झाला. माॅन्सूनने आज राज्यातील सोलापूर, उदगीर आणि नागपूरपर्यंत मजल मारली. राज्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच माॅन्सूनची प्रगती वेगाने होण्यासाठी पोषक हवामानही तयार होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

माॅन्सूनने आज राज्यासह देशातील काही भागांममध्ये प्रगती केली. माॅन्सूनने राज्यातील अलिबाग, सोलापूर, उदगीर आणि नागपूरपर्यंत मजल मारली. तरी अजूनही राज्यातील मोठ्या भागात माॅन्सून दाखल व्हायचा आहे. आज माॅन्सूनने महाराष्ट्राच्या काही भागात प्रगती केली. तर संपूर्ण कर्नाटक, तेलंगणा आणि छत्तीसगड व्यापले.

तसेच मध्य अरबी समुद्राचा काही भाग पूर्व मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर प्रदेशचा काही भाग, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचा बराचसा भाग हरियाना, जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचा काही भागात माॅन्सून दाखल झाला आहे.

माॅन्सूनने यंदा उत्तर आणि पूर्वेकडील वाटचाल वेगाने केली. त्यामुळे माॅन्सून जम्मू आणि काश्मिर भागात वेळेच्या आधीच पोचला. आज माॅन्सूनची दिशा अलिबाग, सोलापूर, उदगीर, नागपूर, मांडला, सोनभद्रा, बक्सर, सिध्दार्थनगर, पंतनगर, बिजनोर, यमुनानगर, उना आणि द्रास या भागात होती. म्हणजेच माॅन्सून या भागात पोचला आहे.

आज माॅन्सूनने देशातील अनेक भागात प्रगती केली. तसेच माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे माॅन्सून पुढील २ दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातीचा बहुतांशी भाग व्यापेल.

तसेच मध्य प्रदेशचा बहुतांशी भाग, उत्तर प्रदेशचा बहुतांशी भाग, बिहरच्या उर्वरित भागात माॅन्सून दाखल होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

यासोबतच उत्तराखडंचा उर्वरित भाग, संपूर्ण हिमाचल प्रदेश, संपूर्ण जम्मू, काश्मिर आणि लडाख माॅन्सून व्यापेल. तर दिल्ली आणि चंदीगडसह हरियानाचा आणखी भाग, गुजराचा आणखी काही भाग आणि पूर्व राजस्थान तसेच पंजबमध्ये माॅन्सून दाखल होण्यात पोषक हवामान आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या चक्राकर वाऱ्याच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. कर्नाटपासून केरळपर्यंत किनापट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. गुजरातच्या किनारपट्टीला एक चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT