Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सून संभाजीनगरपर्यंत

Monsoon Rain : डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर पर्यंतच्या भागात प्रगती केली आहे. देशाच्या उर्वरित भागात मात्र मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ आहे.

अमोल कुटे

Pune News : अरबी समुद्रावरून प्रवाह बळकट असल्याने नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आणखी चाल केली आहे. सोमवारी (ता. १०) सलग तिसऱ्या दिवशी मोसमी वाऱ्यांनी बहुतांश कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात प्रगती केली आहे.

डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर पर्यंतच्या भागात प्रगती केली आहे. देशाच्या उर्वरित भागात मात्र मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ आहे. यंदा मॉन्सूनचा प्रवास अधिक वेगाने होत असल्याचे चित्र आहे.

मॉन्सून गुरुवारी (ता. ६) चार दिवस अगोदर महाराष्ट्रात डेरेदाखल झाला. शनिवारी (ता. ८) पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागात देखील काही भागात मॉन्सून पोचला होता. रविवारी (ता. ९) मॉन्सूनने मुंबईसह, ठाणे, पुणे, नगर, बीड जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात प्रगती केली. सोमवारी (ता. १०) डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत मजल मारली.

अरबी समुद्रातून वेगाने वाटचाल करणाऱ्या मॉन्सूनची बंगालच्या उपसागरावरील शाखा मात्र मंदावल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘रेमल’ चक्रीवादळाने चाल दिल्याने यंदा सर्वसाधारण दीर्घकालीन वेळेच्या तब्बल १० दिवस आधीच (३१ मे) सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मॉन्सूनने मुसंडी मारली होती.

त्यानंतर मात्र उपसागरावरून मॉन्सूनचे प्रवाह मंदावले आहेत. परिणामी विदर्भात मॉन्सूनची अद्याप प्रतीक्षा आहे. अरबी समुद्रातून वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने उत्तर अरबी समुद्र, महाराष्ट्राच्या आणखी काही भाग, दक्षिण गुजरातचा काही भागात उद्यापर्यंत (ता. १२) मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Banana Cultivation: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंदांच्या मागणीत वाढ

Khandesh Tur Lagwad: खानदेशात यंदा तूर लागवड स्थिर राहण्याचे संकेत

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

SCROLL FOR NEXT