Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : मुंबई, पुण्यासह राज्यात मॉन्सूनची प्रगती

Monsoon Rain : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रवाहाचा वेग कायम आहे. पावसाने रविवारी (ता. ९) मोसमी वाऱ्यांनी मुंबई, पुण्यासह ठाणे, नगर, बीडपर्यंतच्या भागात प्रगती केली आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रवाहाचा वेग कायम आहे. पावसाने रविवारी (ता. ९) मोसमी वाऱ्यांनी मुंबई, पुण्यासह ठाणे, नगर, बीडपर्यंतच्या भागात प्रगती केली आहे. देशाच्या उर्वरित भागात मात्र मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ आहे.

महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यंदा मॉन्सूनचा प्रवास अधिक वेगाने होत असल्याचे चित्र आहे. केरळमध्ये दोन दिवस आधीच (३० मे) पोहोचलेला मॉन्सून गुरुवारी (ता. ६) चार दिवस अगोदर महाराष्ट्रात डेरेदाखल झाला.

शनिवारी (ता. ८) रत्नागिरी, सातारा, सोलापूर जिल्ह्यांच्या आणखी काही भागात चाल करतानाच पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांच्या देखील काही भागांत मॉन्सूनने मजल मारली होती. रविवारी (ता. ९) मॉन्सूनने मुंबईसह, ठाणे, पुणे, नगर, बीड जिल्ह्यांच्या बऱ्याचशा भागात प्रगती केली.

अरबी समुद्रातून वेगाने वाटचाल करणाऱ्या मॉन्सूनची बंगालच्या उपसागरावरील शाखा मात्र मंदावल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘रेमल’ चक्रीवादळाने चाल दिल्याने यंदा सर्वसाधारण दीर्घकालीन वेळेच्या तब्बल १० दिवस आधीच (३१ मे) सिक्कीम आणि पश्‍चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मॉन्सूनने मुसंडी मारली होती.

त्यानंतर मात्र मॉन्सूनने पूर्व भारतात प्रगती केली नसल्याचे दिसून आले आहे. मॉन्सून मजल दरमजल करत उत्तरेकडे वाटचाल करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Mahavitaran : सिद्ध पिंपरीत महावितरण विरोधात धडक मोर्चा

Ujani Bridge: उजनीत साकारतोय विकासाचा सेतू!

Nashik Rain: नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Fake Seed Complaints: नागपूर विभागात बोगस बियाण्यांच्या ३९४ तक्रारी

Yavatmal Farmers: यवतमाळमध्ये प्रीमियम वाढीने पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

SCROLL FOR NEXT