Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

Monsoon Latest News : कोकण, घाटमाथ्यावर उद्यापासून वाढणार जोर

Team Agrowon

Maharashtra Rain Update : पदोन दिवसांपासून काहीसा कमजोर झालेला मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. उद्यापासून (ता. १२) कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. आज (ता. ११) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दक्षिणेकडे आलेला मॉन्सूनचा आस सर्वसाधारण स्थितीकडे सरकला आहे. हा कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून कोटा, शिवपुरी, दालतोंगंज, पुरुलिया, कोंताई ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागात परस्पर विरोधी वाहणाऱ्या पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झाले आहे.

बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असतानाच, तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाची उघडीप असलेल्या ठिकाणी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याचे दिसून आले.

राज्यात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळत असून, आज (ता. ११) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. उर्वरित ढगाळ हवामानासह राज्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT