Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update: मॉन्सून कोकणात दाखल; पुढील दोन दिवसात महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मजल मारणार

Latest Monsoon Update : देशात दाखल होण्यासाठी माॅन्सूनने यंदा आठ दिवस उशीर केला. माॅन्सूनच्या केरळ आगमनाची सर्वसाधारण तारीख एक जून असते.

Team Agrowon

Monsoon Arrived In Konkan : नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनची वाटचाल सुरूच आहे. रविवारी (ता. ११) मॉन्सून कोकणात डेरेदाखल झाल्याचे हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलं आहे. पुढील दोन दिवसात मॉन्सून महाराष्ट्राच्या उर्वरित काही भागात मजल मारेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

रविवारी मॉन्सूननं अरबी समुद्र, कर्नाटकचा काही भाग, गोवा, कोकणाचा काही भाग, तामिळनाडू आणि पुड्डेचेरीचा बहुतांश भाग, आंध्रप्रदेशाचा काही भाग, पश्चिममध्य आणि नैऋत्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, ईशान्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे.

पुढील ४८ तास मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पुढील ४८ तासात मॉन्सून अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्रप्रदेशचा काही भाग, दक्षिणमध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर, ईशान्य भागातील काही राज्य, उप हिमालय, पश्चिम बंगाल सिक्कीम आणि बिहार राज्यात मजल मारण्याचे संकेत हवामानशास्त्र विभागानं दिले आहेत.

देशात दाखल होण्यासाठी माॅन्सूनने यंदा आठ दिवस उशीर केला. माॅन्सूनच्या केरळ आगमनाची सर्वसाधारण तारीख एक जून असते. त्यानंतर दरवर्षी सर्वसाधारण ७ जूनला मॉन्सून तळकोकणात दाखल होतो.

परंतु यंदा मॉन्सून केरळमध्ये ८ जूनला दाखल झाला. त्यामुळे केरळात ८ दिवस उशिरा पोचला तर सर्वसाधारण तारखेच्या ५ दिवस उशिरानं मॉन्सून कोकणात दाखल झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT