Monsoon: आज मॉन्सूनने कुठंपर्यंत मजल मारली?

Team Agrowon

बिपॉरजॉय

अरबी समुद्रातील 'बिपॉरजॉय' चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या प्रवाहांना बळकटी मिळाली आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच कर्नाटकच्या किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली आहे.

Monsoon | A B Mane

गोव्याच्या उंबरठ्यावर

गोव्याच्या उंबरठ्यावर असलेल्या, कर्नाटक मधील कारवारपर्यंत मॉन्सूनने मजल मारली आहे. सोमवारपर्यंत (ता. १२) गोवा आणि महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

Monsoon | A B Mane

मुख्य भूमीचे प्रवेशद्वार

मॉन्सूनने गुरूवारी देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये हजेरी लावली. केरळच्या बहुतांश भागासह दक्षिण तामिळनाडूमध्ये मॉन्सूनने वाटचाल केली.

Monsoon | A B Mane

मॉन्सूनने धडक दिली

तर १० जून रोजी मॉन्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनने धडक दिली आहे.

Monsoon | A B Mane

मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा

मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कारवार, मेरकरा, कोडाईकनाल, आदिरामपट्टीनम पर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Monsoon | A B Mane

प्रगतीस पोषक हवामान

वाऱ्यांच्या प्रगतीस पोषक हवामान असल्याने सोमवारपर्यंत मध्य अरबी समुद्र कर्नाटकचा आणखी काही भाग, गोवा आणि महाराष्ट्र आणि तामिळनाडूचया आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

Monsoon | A B Mane
Honey Bee | Agrowon