Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सून अंदमानात दाखल

IMD Monsoon News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) रविवारी (ता.१९) बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात आगमन झाले आहे.

अमोल कुटे

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) रविवारी (ता.१९) बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात आगमन झाले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सूनने प्रगती केली आहे.

तर अरबी समुद्रातून चाल करत मालदिव आणि कोमोरिन भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. अंदमानात दाखल झालेला मॉन्सून यंदा ३१ मेपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.

दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून ३ किलोमीटर उंचीपर्यंत वाहणारे पश्चिमेकडून वाहणारे वाऱ्यांचे प्रवाह, ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत वाहणारे नैॡत्येकडील प्रवाह, आकाशात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग ढगांची दाटी आणि पावसाच्या हजेरीने मॉन्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: २१ मे पर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोचतो, तर २२ मे रोजी अंदमान बेटसमूह व्यापतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. मॉन्सून शुक्रवारी (ता. १९) अंदमानात दाखल झाला आहे.

अंदमानात दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रात साधारणतः २६ मे रोजी पोचणारा मॉन्सून यंदा १९ मे रोजी मालदीव बेटे आणि दक्षिण भारत आणि श्रीलंकेलगत असलेल्या कोमोरीन भागात दाखल झाला आहे. मॉन्सूनचे केरळमधील आगमनही लवकर होत ३१ मे पर्यंत भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून, यात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे. सध्या प्रशांत महासागरात असलेली एल-निनो स्थिती निवळत आहे. मॉन्सून हंगामात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. तर मॉन्सून कालावधीत भारतीय समुद्रातील द्विधृविता (इंडियन ओशन डायपोल -आयओडी) धन (पॉझिटीव्ह) राहण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनचे अंदमानातील आगमन

वर्ष---आगमन

२०१९---१८ मे

२०२०---१७ मे

२०२१---२१ मे

२०२२---१६ मे

२०२३---१९ मे

२०२४---१९ मे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT